तेरे नाम पान शॉप तर्फे सलमान खान यांचा ५७ वा वाढदिवस साजरा

 तेरे नाम पान शॉप तर्फे सलमान खान यांचा ५७ वा वाढदिवस साजरा








सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या चाहत्याच्यावतीने औसा शहरातील तेरे नाम पान शॉप येथे भव्य केक कापून सिने अभिनेता सलमान खान यांचा ५७ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तेरे नाम पान शॉपचे मालक बासिद शेख हे सलमान खान यांचा वाढदिवस गेल्या 20 वर्षापासून भव्य असं साजरा करतात सिने अभिनेता सलमान खान यांचे पोस्टर लावून शहरातील तहसील कार्यालय येथे भव्य फटाक्याच्या गजरात वाढदिवस साजरा करण्यात आला. सलमान खान यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शहरातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहतात व सलमान खान यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते आज औसा येथे तब्बल दहा किलोचा केक कापून तेरे नाम पान शॉपच्या वतीने सलमान खान यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी तेरे नाम चे मालक बाशीद शेख, नगरसेवक साजिद काजी, काँग्रेस पक्षाचे नेते मुजमिल शेख, सामाजिक कार्यकर्ता उमेशअप्पा सोलापुरे, मिनहाज इनामदार, अलीम पटेल, राशीद शेख, तोफिक सिद्दिकी, आरिफ शेख, लोकमत पत्रकार महबूब बक्षी, मुबीन काझी सह आदी मान्यवर व सलमान खान यांचे चाहते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या