*घरफोडीतील आरोपींकडून, चोरीस गेलेले सोन्याच्या दागिनेसह 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 3 आरोपींना अटक. पोलीस ठाणे शिवाजीनगरची कामगिरी.*
लातूर रिपोर्टर न्यूज़
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 23 डिसेंबर रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीतील जुना औसा रोड परिसरातील एका घरात अज्ञात चोरट्यांने प्रवेश करून घरातील 52 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले तक्रारीवरून पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गुरनं 514/2022 कलम 454,380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिवाजीनगर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दयानंद पाटील यांचे नेतृत्वात पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना देण्यात आले होते.
तपासा दरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरून आरोपी नामे
1) अक्षय राम तेलंगे, राहणार गोपाळ नगर ,लातूर.
2) प्रशांत अर्जुन शिंदे, राहणार पाखरसांगवी, लातूर.
3) प्रफुल प्रकाश पवार, राहणार गिरवलकर नगर, लातूर.
यांना दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले असता, त्यांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल 52 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार शिरसाठ करीत आहेत.
सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक दयानंद पाटील यांचे नेतृत्वातील टीम मधील पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे सहाय्यक फौजदार रामचंद्र ढगे, पोलीस अंमलदार महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के, अंगद शिरसाट, युवराज गिरी, वालचंद नागरगोजे, बालाजी कोतवाड, पद्माकर लहाने, काकासाहेब बोचरे यांनी गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.