किल्लारी शहराला तात्काळ तालुक्याचा दर्जा द्यावा लातूर जिह्यातील शिरूर अनंतपाळ ,जळकोट, देवणी ,शहराला तालुक्याचा दर्जा मिळतो तर *किल्लारी शहराला का नाही* सामाजिक कार्यकर्ते:- लक्ष्मण कांबळे

 ,किल्लारी शहराला तात्काळ तालुक्याचा दर्जा द्यावा 


लातूर जिह्यातील शिरूर अनंतपाळ ,जळकोट, देवणी ,शहराला तालुक्याचा दर्जा मिळतो तर

 *किल्लारी शहराला का नाही* 

सामाजिक कार्यकर्ते:- लक्ष्मण कांबळे








प्रतिनिधी --------------------------


  किल्लारी या गावाला अनेक दिवसापासून तालुका  निर्मिती साठी मागणी होत असून या किल्लारी सह परिसरातील नगरीच्या मागणीला मान्यता देऊन किल्लारी हा तालुका करण्यात यावा

  सन्माननिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब  किल्लारी हे गाव पुरातन काळापासून इतिहास जमा गाव आहे.तसेच १९९३  सालाच्या भूकंपापासून तर देशातच नाहीतर विदेशात ही किल्लारी ची नवीन ओळख झाली आहे  या गावचा आजूबाजूच्या जवळपास ६७ गावसाशी नाळ जोडली गेली आहे यागावत दवाखाने, साखर कारखाना, बाजारपेठ, बँका,पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन, शाळा, कॉलेज निळकंटेश्वर मंदिर,पोलीस स्टेशन व इतर काही छोटे मोठे व्यवहारासाठी  गावाशी परिसरातील नागरिकाचा संबंध येत असतो,किल्लारी गाव हे तस पाहिले तर लातूर ते गुलबर्गा या मुख्य रस्त्यावर असून  दळणवळणाची ही येथून मोठी उलाढाल होत असते,. म्हणून किल्लारी च्या नागरिकांनी   किल्लारी गावाला  तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून मागणी  केली आहे .

यासाठी अनेकांनी अनेकदा निवेदने दिलेत ,शिवाय,रास्ता रोको ही करण्यात आला आहे. तरी पण शासन दरबारी अद्याप कसलीच दखल या संदर्भात घेण्यात आली नाही म्हणून पुन्हा शासनाला स्मरण करून देण्यासाठी दिनांक *२१ डिसेंबर* *२०२२  रोजी किल्लारी वाशियाच्या* *व परिसरातील* *नागरिकांच्या वतीने रास्ता रोको* *आंदोलनांचा इशारा देण्यात आला* आहे.तरी माननीय मुख्यमंत्री साहेबानी या  होत असलेल्या मागणीसाठी  स्वतः जातीने या प्रकरणाचा छडा लावावा ही समस्त किल्लारी व परिसरातील नागरिकांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे 

मी ही एक नागरिक या नात्याने आपणाकडे किल्लारी शहराला तालुक्याचा दर्जा  मिळावा म्हणून मागणी करतोय

              

----------------------------------------------

- १)लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ, जळकोट, देवणी, या गावांना तालुका करण्यात आले मग 

*किल्लारी ला का नाही*???

२) किल्लारी तालुक्याचा संभाव्य नकाशा व त्यात समाविष्ट औसा तालुक्यातील ४४ गावे व निलंगा तालुक्यातील११ गावे व उमरगा तालुक्यातील१२गावे   असे मिळून

६७ गावचा समावेश करण्यात आला आहे,

३) या  वरील गावातील  किल्लारीला  तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून सरपंचा चे सहमती पत्र पूर्वी  आपल्या कार्यालयात  निवेदने व सदर  कागद उपलब्ध आहेत ते निवेदने व आता येणारे निवेदने आपण पाहावेत

४)*ही मागणी समस्त किल्लारी कर व परिसरातील नागरिकांची आहे तरी मा मुख्यमंत्री साहेबांनी याकडे  लक्ष घालून  किल्लारी कराच्या मागणीला  मान्य करावे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या