ॲलन करिअर इन्स्टिट्यूट चे लातूरात शानदार उद्घाटन 34 वर्षाच्या अनुभवाचा लातूरकरांना मिळणार लाभ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ओलंपियाड साठी होणार तयारी

 ॲलन करिअर इन्स्टिट्यूट चे लातूरात शानदार उद्घाटन 


34 वर्षाच्या अनुभवाचा लातूरकरांना मिळणार लाभ 


राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ओलंपियाड साठी होणार तयारी 

..







लातूर प्रतिनिधी वैद्यकीय आणि अभियांत्रिक प्रवेश परीक्षेच्या तयारीच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेले एँलन इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड आता लातूरमध्ये क्लासरूम कोचिंग प्रदान करणार असून महाराष्ट्राची शिक्षण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरमध्ये ॲलन करिअर इन्स्टिट्यूट चा शुभारंभ बुधवार दिनांक 18 जानेवारी रोजी करण्यात आला. अंबाजोगाई रोड लातूर येथील अतिथी रेस्टॉरंट  येथे शानदार उद्घाटन सोहळा बुधवार दिनांक 18 जानेवारी रोजी संपन्न झाला. यावेळी ॲलनचे उपाध्यक्ष अमित मोहन अग्रवाल, केंद्रप्रमुख लातूर डॉ निखिल मेहता, केंद्रप्रमुख नांदेड संजीव कुमार, ॲलन नाशिक आणि नांदेड चे प्रशासन प्रमुख हितेंद्र सूर्यवंशी शिक्षण तज्ञ भार्गव राजे आदी मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना अमित मोहन अग्रवाल म्हणाले एँलन इन्स्टिट्यूट मागील नऊ वर्षापासून महाराष्ट्रात सेवा देत असून यावर्षी केवळ विद्यार्थ्यांचा पाठिंबा आणि पालकांचा विश्वास जिंकला नाही तर बरेच चांगले निकालही इन्स्टिट्यूटने दिले आहेत. त्यामुळे मुंबई पुणे नागपूर नांदेड आणि नाशिक नंतर आता एँलन  लातूरमध्ये सेवा सुरू करीत आहे. लातूर हे महाराष्ट्रातील एक शैक्षणिक शहर असून येथील विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.लातूरमध्ये तज्ञाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले तर त्यांची कामगिरी आणखी चांगली होईल. या सर्व बाबीचा विचार करून एँलने  लातूरमध्ये केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून लातूर मधील एँलनचे ऑफलाइन अभ्यास केंद्र सुरू होत आहे येथे आयआयटी आणि जेईई तसेच वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट सह इतर वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी केली जाणार आहे. 2023 /24 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी एप्रिल महिन्यापासून बॅचेस सुरू होणार आहेत.20 फेब्रुवारी पूर्वी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष शुल्क लाभ देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा आणि एँलन स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट मधील कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांना 90% पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना दुहेरी फायदा होणार असून एँलन स्कॉलरशिप एडमिन टेस्ट 29 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. सेंटरचे प्रमुख डॉ निखिल मेहता यांनी सांगितले की ऐलान चे प्रवेश कार्यालय उद्योग भवन जवळ इंडस्ट्रियल इस्टेट लातूर येथे असणार आहे. एँलान मध्ये शिकत असताना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. प्रत्येक निकालाच्या टॉप रँक मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.येथे एँलन केअर फर्स्ट च्या धरतीवर सुरू होतील. विद्यार्थ्यांच्या करिअर सोबत काळजी आणि शासनालाही शिस्त आणि संस्कार याला प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष ठेवण्यास सोबत विद्यार्थी निरोगी वातावरणात शिक्षण व संस्कार घेतील. विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची गरज आहे.कोचिंग चा 34 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेली ऍलन करिअर इन्स्टिट्यूट कोटा ही विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. सध्या दर्जेदार शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागते किंवा तडजोड करावे लागते. मात्र आता त्यांच्या गुणवत्तेनुसार नक्षीकाम करून त्यांची स्वप्न साकार होणार आहेत. ॲलन ने दिला ऐतिहासिक निकाल 18 एप्रिल 1988 रोजी कोटा येथे स्थापन झालेल्या ॲलन करिअर इन्स्टिट्यूट मध्ये आतापर्यंत 27  लाखाहून अधिक विद्यार्थी सामील झाले आहेत. देशातील 46 शहरांमध्ये सेवा सुरू असून संस्थेमध्ये  11000 हून अधिक सदस्यांचे कुटुंब आहे. निकालाबद्दल बोलताना गेल्या 13 वर्षात वैद्यकीय आणि अभियांत्रिक प्रवेश परीक्षेमध्ये 18 ऑल इंडिया रँक दिले आहेत. 2022 मध्ये संस्थेच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तनिष्काने ऑल इंडिया रँक क्रमांक एक मिळविला आहे.तसेच जेईई ऍडव्हान्सड 2021 मध्ये एँलनच्या वर्गातील विद्यार्थी मृदुल अग्रवाल ने जे ईई इतिहासात आतापर्यंतचे सर्वोच्च गुण मिळवून ए आय आर क्रमांक एक मिळविला आहे.2020 मध्ये एलन च्या वर्गातील शोयब आफताब  वैद्यकीय प्रवेश परीक्षेत नीट मध्ये इतिहास रचला. त्यामुळे आता लातूर व परिसरातील विद्यार्थ्यांना ॲलन करिअर इन्स्टिट्यूट ही शैक्षणिक क्षेत्रात वरदान ठरणार असून शैक्षणिक क्षेत्रामध्ये लातूर ही काशी समजली जाते. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना संस्कारासोबत गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अमित मोहन अग्रवाल यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या