अल्प खर्चात एकरी १०० टना पर्यंत ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी विलास सहकारी साखर कारखाना सुवर्ण कृषी व ग्रामविकासाच्या उपक्रमातर्गत पुढाकार घेणार चेअरमन वैशाली विलासराव देशमुख

 

अल्प खर्चात एकरी १०० टना पर्यंत ऊसाची उत्पादकता
वाढविण्यासाठी विलास सहकारी साखर कारखाना
सुवर्ण कृषी व ग्रामविकासाच्या उपक्रमातर्गत पुढाकार घेणार
चेअरमन वैशाली विलासराव देशमुख






 लातूर प्रतिनिधी : शुक्रवार दि. २० जानेवारी २०२३
उसाचा उत्पादन खर्च कमी करून अल्प खर्चात एकरी १०० टना पर्यंत ऊसाची
उत्पादकता वाढविण्यासाठी विलास सहकारी साखर कारखाना कृषीरत्न पदमभूषण
ज्येष्ठ शास्त्रज्ञ, डॉ. विजय भटकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या
सुवर्ण कृषी व ग्रामविकासाच्या उपक्रमांतर्गत पुढाकार घेणार आहेत. या
अनुषंगाने प्रकल्पाचे मुख्य ऊस संशोधक, शास्त्रज्ञ डॉ.अमोल पाटील,
मुख्यव्यवस्थापक नानासाहेब कदम यांनी कारखान्याच्या चेअरमन श्रीमती
वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या सोबत प्रकल्पाच्या संदर्भाने चर्चा
केली. यानंतर बाभळगाव येथे ऊस शेतीस भेट देऊन पाहणी केली.
कृषिरत्न पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी स्थापन केलेला सुवर्ण कृषी
राष्ट्र निर्माण प्रकल्प अंतर्गत डॉ. विजय भटकर व डॉ. अमोल पाटील यांनी
कृषी क्षेत्रात नऊ वर्ष अभ्यास आणि संशोधन केले आहे. या क्षेत्रात काम
करण्यासाठी सुवर्ण कृषी व ग्रामविकासाचा उपक्रम सूरू केला आहे. यामध्ये
सेंद्रिय कर्ब वाढविणारे नैसर्गिक शेती तंत्रज्ञान, प्रिसिजन ड्रोन
टेक्नॉलॉजीद्वारे शेती व्यवस्थापन, देशांतर्गत व निर्यातीसाठी कृषी
शेतीमाल विक्री व्यवस्था, अल्प खर्चात इ.एम. द्रावणद्वारे नदी शुद्धीकरण,
आगामी काळात भारतीय युवकांना कृषी क्षेत्रात असणाऱ्या संधी, विषमुक्त ऊस
व इतर शेतीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. या उपक्रमातून कमीत कमी खर्चात
ऊसाची एकरी उत्पादकता १०० टन पर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार
आहेत. या संशोधनातून उसशेतीत अल्प खर्चात शास्त्रशुद्ध पध्दतीने संतूलीत
रासायनिक खताचा स्पीड पद्धतीने वापर करणे, जिवाणू खताचा वापर, अल्प
खर्चाचे ऊस उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान लातूर
जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यासाठी  प्रकल्पाचे
मुख्य ऊस संशोधक, शास्त्रज्ञ डॉ. अमोल पाटील, मुख्य व्यवस्थापक नानासाहेब
कदम यांनी कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख
यांच्या सोबत प्रकल्पाच्या संदर्भाने चर्चा केली. यानंतर त्यांनी बाभळगाव
येथे ऊस शेतीस भेट देऊन पाहणी केली. यावेळी टवेन्टिवन शुगरर्स ली.चे
मुख्य उसविका अधिकारी दिलीपराव कदम,  बाभळगाव पंचक्रोशीतील ऊसउत्पादक
शेतकरी यावेळी हजर होते.
----



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या