Adv मनोहररावजी गोमारे साहेब ः कर्मयोगी

 

अ‍ॅड.मनोहररावजी गोमारे साहेब ः कर्मयोगी
आपले कार्य संपवूनि सगळे ।
जो दुसर्‍याच्या सेवेसि वळे ।
तोचि चढे कार्य बळे ।
लौकिकाशी आणि उन्नतीशी ।





राष्ट्रसंत पुज्य तुकडोजी महाराजाने त्यांच्या ‘ग्रामगीत’ या काव्यात उपरोक्त पंक्तीत उदघृत केल्याप्रमाणे मा.व आदरणीय अ‍ॅड.मनोहररावजी गोमारे साहेबांची (मा.व आदरणीय अ‍ॅड.गोमारे काकांची) जीवनक्रमना असली तरी त्यांची ती जीवनक्रमना फारच संघर्षमय आहे. संघर्ष हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत त्यावर मात केलेली आहे. त्यांचे दुर्भाग्य असे की, ते अवघे सहा महिन्याचे असतानाच त्यांची जन्मदात्री आई स्वर्गवासी झाल्याने आभाळागत अनंत व सागरासम अथांग माया असलेल्या जन्मदात्री आईच्या मायेची उब मिळणेपासून व आईच्या कुशीत गाढ निद्रित होणेपासून ते वंचितच राहिले, माझे शैक्षणिक सद्गुरू थोर विचारवंत माजी खासदारांना व आदरणीय डॉ.जनार्दनरावजी वाघमारे सरांनी अ‍ॅड.गोमारे लिखीत ‘सत्वपरीक्षा माझा संघर्षमय जीवन प्रवास’ या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. ‘संघर्ष आणि मनोहरराव गोमारे’ हे पर्यायवाचक शब्द आहेत. संघर्षाने त्यांचे जीवन अधोरेखित झाले आहे. जिथे गोमारे तिथे संघर्ष हे समीकरण घट्ट झाले आहे. ते उदार, उदात्त व धिरोदत आहेत.
मा.आदरणीय अ‍ॅड.गोमारे साहेबांनी 1962 साली मराठवाडा विद्यापीठातून एल.एल.बी.मध्ये प्रथम श्रेणीत सर्वप्रथम येवून कायद्याची पदवी संपादन केल्याने त्यांचे कायद्याचे महाविद्यालयीन अध्ययन पूर्ण झाले असले तरीही वकीली व्यवसायाच्या अनुभवाचे मार्गदर्शन मिळणेसाठी निष्णात कायदेपंडित असलेले व त्यांच्याकडे कोर्टातील विपूल प्रकरणे असलेले व ते प्रकरण आपल्या ज्युनियरला कोर्टापुढे चालवण्यास लावणारे गुरू (सिनिअर) लाभायला हवेत. ज्ञानी गुरूशिवाय ज्ञान मिळत नसते असं संत कबीरजीने त्यांच्या दोह्यात म्हटले आहे.
गुरू नारायण रूप है, गुरू ज्ञान को घाट ।
सद्गुरू बचन प्रताप सो, मन के मिटे उचाट ॥
असे सद्गुरू लाभायला हवेत. मा.व आदरणीय अ‍ॅड. गोमारे साहेबांच्या सुदैवाने त्यांना लातूरचे प्रख्यात ज्ञानी मतसुद्दी निष्णात कायदेपंडित प्रति अ‍ॅड. राम जेठमलांनीच असलेले आदरणीय अ‍ॅड.हरिश्चंद्रराव पाटील रेड्डी साहेब हे महान मान्यवर सद्गुरू लाभले. (सिनिअर लाभले) त्यांच्या त्या महान सद्गुरूचे कनिष्ठ बंधू आदरणीय अ‍ॅड.धनंजयराव पाटील-रेड्डी साहेब हे मान्यवरही त्यांच्या या ज्येष्ठ बंधूसोबतच वकीली व्यवसाय करत असत. ते आपल्या ज्येष्ठ बंधूला भाई म्हणत असत. त्यामुळे त्यांच्याप्रमाणेच लातूर बारची सर्वच वकील मंडळीही ते आपले बडे भाईच आहेत असं मानून आदराने त्यांना भाईच म्हणत असत, मा.व आदरणीय सद्गुरू अ‍ॅड. भाईकडे मा. व आदरणीय अ‍ॅड.गोमारे साहेबांबरोबरच आदरणीय अ‍ॅड.शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब व आदरणीय अ‍ॅड. शिवराजजी पाटील सुल्लाळीकर साहेब हे मान्यवरही जुनियर म्हणूनच कार्यरत होते. त्या तीघांचेही इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, यात्रियेने परीक्षापुरता अभ्यासक्रमाचा अभ्यास न करता अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही कायदेविषयक ग्रंथाचे सखोल अध्ययन उपासना व साधना केल्याने त्यांना कायदेशीर भरपूर ज्ञान आत्मसात केले होते. त्यांचे कायदेविषयक ज्ञान जाण व उंची हे सर्व त्यांच्या जाणत्या सद्गुरूच्या तुरंत लक्षात आल्याने त्यांच्या त्या जाणत्या सद्गुरूने आपल्याकडचे कोर्टात प्रलंबित असलेले प्रकरणे आपल्या या तिन्हीही अभ्यासू व कायद्याच्या जाणकार शिष्यांकडे (ज्युनिअरकडेच) चालविण्यासाठी सुपूर्द करून कोर्टापुढे चालवण्यात लावले. या तिन्हीही विधीज्ञ ज्युनिअर शिष्याने आपल्या जाणत्या सद्गुरूकडून वकिली व्यवसायातील कसब व कौशल्य अवगत तर केलेच त्याबरोबर माझे शैक्षणिक सद्गुरु थोर विचारवंत माजी खासदार व आदरणीय डॉक्टर जनार्दनरावजी वाघमारे सरांनी अ‍ॅडवोकेट गोमारे लिखित सत्वपरीक्षा माझा संघर्षमय जीवन प्रवास या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे वकिली व्यवसायात यशस्वी होण्यासाठी लागणारे पाच पी चे सूत्र हे हस्तगत केले व ते तिघेही आपले थोर सद्गुरू अ‍ॅडव्होकेट भाईसारखेचनिष्णात कायदे पंडित झाले व सर्वत्र नावलौकिक पावले गुरुला शिष्य पुत्रा समान असतात पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा असे हे तिन्ही पुत्रवत शिष्यनिष्णात कायदेपंडित झाल्याचे पाहून त्यांच्या गुरुला जीवनभर अभिमान वाटत राहिला. आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी दाभोळकर या मान्यवरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याला साथ दिलेले व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लातूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी कार्यरत असलेले आदरणीय अ‍ॅडवोकेट गोमारे साहेब हे मान्यवर देव मानतात की मानत नाहीत हे मला माहित नाही परंतु त्यांचेच स्नेही माजी केंद्रीय गृहमंत्री व पंजाबचे माजी राज्यपाल अ‍ॅडवोकेट शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब हे मान्यवर म्हणत असतात देवावर श्रद्धा असणे म्हणजे अंधश्रद्धा नव्हे त्या मान्यवर नेत्यासारखीच माननीय व आदरणीय अ‍ॅडवोकेट गोमारे साहेबांचीही देवावर गाढ श्रद्धा असेल आणि त्यांच्यापुढे प्रत्यक्ष देव व त्यांचे सद्गुरू अ‍ॅडवोकेट भाई एकावेळी जाऊन उभा टाकले तर संत कबीरजीने त्यांच्या दोहात म्हटल्याप्रमाणे गुरुगोविंद होऊ खडे काके लागू पाय बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताया संत कबीरजीने त्यांच्या दोह्यात म्हटल्याप्रमाणेच माननीय व आदरणीय अ‍ॅडव्होकेट गोमारे साहेबांनी प्रथम त्यांचे गुरु अ‍ॅडव्होकेट भाईच्याच चरणावर नतमस्तक होऊन त्यांच्याच चरणी वंदन केले असते त्यांची अशी गाड श्रद्धा त्यांचे गुरु अ‍ॅडव्होकेट भाई वर होती, तशीच त्यांची गाड श्रद्धा मानवतावादी थोर स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ समाजवादी नेते आदरणीय श्री एस. एम.जोशी या मान्यवरावरही होती. आदरणीय श्री एस.एम.म्हणजे आजतशत्रूच.
मा.व आदरणीय अ‍ॅडव्होकेट गोमारे साहेबांनी त्यांच्या वकिली व्यवसायाचा शुभारंभ केल्यानंतर वर्षभराने त्यांच्या ग्रहस्ती जीवनाचाही आरंभ झाला. अवघाची संसार सुखाचा करीन याप्रमाणे त्यांनी संसाराची जबाबदारी व कर्तव्य नीट पार पाडत आपल्या वकिली व्यवसायाबरोबरच अगदी निरपेक्षपणे संताने सांगितल्याप्रमाणे जे का रांजले गांजले तयाशी मने आपुले असं रंजल्या गांजलेल्यांना अतीत-पतीत, दिन-पददलित, वंचित, पीडित, उपेक्षित अशा अभावग्रस्त लोकांचे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सर्वच जातीपंथाच्या धर्माच्या व वर्गाच्या लोकांचे प्रकरणे विनामूल्य कोर्टात चालवून त्यांना कायदेशीर न्याय मिळवून देत आले आहेत. ते अभावगस्त लोकांचे सखा व देवच आहेत. अ‍ॅडव्होकेट गोमारे लिखित ‘सत्वपरीक्षा माझ्या संघर्षमय जीवन प्रवास’ या पुस्तिकेच्या प्रकाशक भगिनी डॉ. रेखाताई गोमारे-रेड्डी यांनी त्यांच्या मनोगत म्हटले आहे. पैशासाठी नव्हे तर गरजवंतांच्या गरजेसाठी काम करणे हाच दादांचा कर्तव्यभाव पूज्य साने गुरुजीने मानवाचा खरा धर्म त्यांच्या कवितेतून खालीलप्रमाणे सांगितला आहे.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे,
जगी जे दिन आप अतिपतीत
जगी जे दिन पददलित
तया जाऊनी उठवावे जगाला प्रेम अर्पावे.
पूज्य साने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अतिपतीत दीन पददलीत, शोषित, पिढीत, उपेक्षित, वंचित, रंजले गांजलेले अशा अभावग्रस्त लोकांची सेवा करीत आलेल्या मानवतावादी आदरणीय अ‍ॅडव्होकेट गोमारे साहेबांचाही  जगाला प्रेम अर्पिने हाच धर्म आहे. रंजले गांजलेले अभावग्रस्त लोक संकटात असतील तर द्वारकेच्या राजासारखेच ते धावून जाऊन त्यांचा बचाव करतात आणि झोपडीत राहणार्‍या म.विदुराच्या कन्या आनंदाने खाण्यात तसंच ते अभावग्रत लोकांच्या कन्याही आनंदाने खातात.
शिक्षणाशिवाय मानव म्हणजे आंधळा, मुका, बहिरा व हात पाय नसलेला पांगळाचा होय. आपल्या भारत देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, प्रज्ञावंत, पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने म्हटले आहे. ‘शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे पशु व निव्वळ धोंडाच होय.’ मानवाच्या प्राथमिक गरजेपैकी एक महत्त्वाची गरज आहे शिक्षण. शिक्षणाशिवाय ज्ञान नाही व ज्ञान शिवाय सर्वांगीण उन्नती नाही. हे विचारात घेऊनच आदरणीय अ‍ॅडव्होकेट  गोमारे साहेबांनी काही समविचारी शिक्षणप्रेमी लोकांना सोबत घेऊन भारत एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. ते 1975 ते 1990 पर्यंत सदर संस्थेच्या सचिवपदी कार्यरत होते तर 1990 पासून अध्यक्षपदी कार्यरत आहेत. ते शिक्षण दानदाता व ज्ञानदाता आहेत.
मुंबईत असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या परिघातील वस्तीच्या विषमतेच्या विदारक दृष्याचे यथार्थ वर्णन कवी कुसुमाग्रजाने त्यांच्या कवितेत खालीलप्रमाणे केले आहे.
कंगाल खोपटे कोळ्यांची पायथ्याशी ।
वर असीम मगनी नक्षत्रांच्या राशी॥
आपल्या देशात असलेली अशी आर्थिक व सामाजिक विषमतेचे दरी दूर करून समता आणावयाची असेल तर समाजवादाशिवाय पर्याय नाही असा आदरणीय अ‍ॅडव्होकेट गोमारे साहेबांना वाटल्याने तसेच ते आदरणीय डॉ. राममनोहर लोहिया यांच्या समाजवाद, समतावाद व धर्मनिरपेक्षता या विचाराने प्रभावित झाल्याने त्यांनी आपल्या असंख्य साथीदारासह 1967 साली संयुक्त समाजवादी पक्षात प्रवेश केला. ज्येष्ठ समाजवादी नेते श्री एस.एम.जोशी या मान्यवरांच्या आचार व विचारांची व आचार विचारांच्या संस्काराची जडणघडण झालेल्या लोहियावादी साथी आदरणीय अ‍ॅडवोकेट गोमारे साहेबांनी अभावग्रस्त लोकांच्या उन्नतीसाठी तसेच आर्थिक व सामाजिक समतेसाठी व सामाजिक न्यायासाठी आणि धर्मनिरपेक्ष राहून सर्वधर्म समभाव जोपासून धार्मिक सौहार्दासाठी आपले जीवन समर्पित केले. समर्पणात प्रेम, दया व करूणा असते. त्यांनी 25% राजकारण व पंच्याहत्तर टक्के समाजकारण केलेले आहे. त्यांना 2012 च्या जुलैमध्ये महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशन तर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच 2022 च्या डिसेंबरमध्ये सम्यक समाजसंघ व धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नीतीप्रज्ञ न्यायरक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय श्री अण्णा हजारे व आदरणीय डॉ.बाबा आढाव या मान्यवरांचा लातूर मार्गे नांदेड असा धावता दौरा होता. त्यांच्या या धावत्या दौर्‍यामध्येही आयोजकांनी त्या उभयंत्याचे व्याख्यान लातूरच्या टाऊन हॉलच्या सभागृहात आयोजित केले होते. श्रोत्यांमध्ये आदरणीय अ‍ॅडवोकेट गोमारे साहेब व माजी केंद्रीय मंत्री आदरणीय टी.एस.श्रृंगारे साहेब हे दोघे मान्यवर स्नेही मिळून बसले होते. कर्मयोगी डॉ.बाबा आढावाने आपल्या अवघ्या चार-पाच मिनिटाच्या उगवत्या व्याख्यानातही आदरणीय अ‍ॅडवोकेट गोमारे साहेबांच्या विधायक व सामाजिक कार्याचा आवर्जून उल्लेख केला होता. योगीयाच्या खुणा योगी जाणे याप्रमाणे कर्मयोगी आदरणीय अ‍ॅडव्होकेट गोमारे साहेबांना कर्मयोगी आदरणीय डॉ.बाबा आढावच जाणो.
सन 2013 च्या 5 जून रोजी झालेल्या कर्मयोगी आदरणीय अ‍ॅडव्होकेट गोमारे साहेबांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात माजी केंद्रीय गृहमंत्री व पंजाबचे माजी राज्यपाल आदरणीय अ‍ॅडव्होकेट शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब हे मान्यवर म्हणाले होते, राजकीय क्षेत्रात कार्य करणे कठीण नाही परंतु सामाजिक क्षेत्रात कार्य करणे अतिशय कठीण असते व ते अत्यंत कठीण सामाजिक कार्य अ‍ॅडव्होकेट गोमारेंनी केलेले आहे. माझे शैक्षणिक सद्गुरू थोर विचारवंत माजी खासदार, मा. व आदरणीय डॉक्टर जनार्दनरावजी वाघमारे सरांनी अ‍ॅडव्होकेट गोमारे लिखित ‘सत्वपरीक्षा माझा संघर्षमय जीवन प्रवास’ या पुस्तिकेचे प्रस्तावनेत म्हटले आहे, समाज प्रबोधन व समाज परिवर्तन हे अ‍ॅडव्होकेट मनोहरराव गोमारेंच्या आवडीचे व निष्ठेचे विषय आहेत. या कार्यातून त्यांची प्रतिमा समाजसेवक म्हणूननच झालेली आहे. पुढे ते म्हणतात, कर्मयोग्याचे जीवन जगणार्‍या व्यक्ती समाजात फारच कमी असतात. अशा व्यक्तीमध्ये अ‍ॅडव्होकेट गोमारे यांचा अंतर्भाव केला पाहिजे असे थोर कर्मयोगी आहेत. आदरणीय अ‍ॅडव्होकेट गोमारे साहेब
कर्मयोगी पूजनीय अ‍ॅडव्होकेट मनोहरजी गोमारे साहेब (पूजनीय अ‍ॅडव्होकेट गोमारे काका) हे मान्यवर 2023 च्या 19 जानेवारी रोजी 86 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या पूजनीय थोर कर्मयोगी आरोग्य संपन्न व उदंड दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना, या थोर कर्मयोग्यास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
- सौ.लता युवराज मुमाने
मो.9420212701

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या