पोलीस ठाणे एमआयडीसीच्या विशेष पथकाची कारवाई, चोरीच्या गुन्ह्यातून जामीनवर सुटताच परत चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चोरलेल्या मोटारसायकलसह अटक



            

    *पोलीस ठाणे एमआयडीसीच्या विशेष पथकाची कारवाई, चोरीच्या गुन्ह्यातून जामीनवर सुटताच परत चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चोरलेल्या मोटारसायकलसह अटक*






             या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी  चे गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावरील पोलीस पथका कडून जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी संबंधाने घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

           सदर मोहीम अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक श्री. संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अमलदार यांचे विशेष पथक तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठाकडून वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात येत होते. 

            सदर पथक पोलीस ठाणे हद्दीतील घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना दिनांक 13/01/2023 रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे एमआयडीसी येथे दाखल असलेल्या  मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी हा नुकताच चोरीच्या गुन्ह्यातून जिल्हा कारागृह लातूर येथून जामीनवर सुटलेला सराईत गुन्हेगार सुमित दगडू गर्गेवाड हा असण्याची शक्यता आहे. अशी माहिती मिळाल्याने माहितीची शहनिशा व विश्लेषण करून सदर पथक नमूद गुन्हेगार वावरणाऱ्या त्या-त्या भागात आरोपीचा शोध घेतले असता  मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित नामे-


1) सुमित दगडू दर्गेवाड, वय 25 वर्ष, राहणार मळवटी रोड,सिद्धेश्वर नगर, लातूर.


          यास दिनांक 13/01/2023 रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलीस ठाणे एमआयडीसीच्या हद्दीतील श्याम नगर येथून मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून अधिक तपास करून नमूद पथकाने त्याच्याकडून चोरलेली 1 लाख 10 हजार रुपये किमतीची पल्सर मोटर सायकल जप्त केली आहेत. नमूद आरोपीना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

            चोरीच्या गुन्ह्यातून जिल्हा कारागृहातून जामीनवर सुटताच दुसऱ्याच दिवशी परत चोरीचा गुन्हा करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्कृष्टरित्या तपास करून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करून  मोटार सायकल  जप्त करून आरोपीस अटक केलेली आहे.

           सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक श्री.संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड, पोलीस अमलदार बेल्लाळे , प्रताप वांगे ,अर्जुन राजपूत , गोविंद चामे, शिंगाळे, शिंदाडकर,जाधव यांनी पार पाडली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या