शेटे इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर चा शुभारंभ

 शेटे इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर चा शुभारंभ 






औसा (प्रतिनिधी)औसा येथील सामाजिक कार्यकर्ते गुरपदप्पा शेटे यांचे सुपुत्र अजय शेटे यांच्या शेटे इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर्स या नवीन फॉर्मचा भव्य शुभारंभ विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.

याप्रसंगी नाथ संस्थानचे मच्छिंद्रनाथ महाराज, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशप्पा ठेसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अभियंता चंद्रशेखर कुर्ले, डॉ सुनील हेलालपुरे, प्रदीप मोरे ,वैजनाथ सिंदुरे ,हनुमंत राचट्टे, राजाभाऊ जोगदंड ,मल्लिकार्जुन निगुडगे, राजाभाऊ नागराळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे फिल्ड ऑफिसर जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 याप्रसंगी बोलताना सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व असून आपल्या संकल्पनेतील नूतन वास्तू शास्त्रोक्त पद्धतीने उभारण्यासाठी अजय शेटे यांनी सुरू केलेल्या या नवीन फॉर्मचा औसेकरांना निश्चित लाभ होईल.

दर्जेदार वास्तू उभा करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.त्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे जनतेच्या आशीर्वादाने शेटे इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स या नवीन फॉर्मला निश्चितच येणाऱ्या काळात चांगले दिवस येतील अशी अपेक्षा सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सदानंद शेटे ,गजानन शेटे ,चेतन शेटे ,ओंकार शेटे, राजाभाऊ शेटे, राहुल शेटे यांच्यासह परिवारातील सर्व सदस्य व शहरातील व्यापारी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या