हसेगाव येथील सिमेंट काॅंक्रेट रस्त्यांचे श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
हात से हात जोडो अभियानाची हसेगाव पासून शुभारंभ
औसा प्रतिनिधी
औसा मतदारसंघातील विविध गावांसाठी श्रीशैल्य उटगे यांनी तत्कालीन पालकमंत्री ना अमित देशमुख यांच्या कडे सतत पाठपुरावा करत हसेगाव येथील अंतर्गत सिमेंट काॅंक्रेट रस्त्यासाठी 15 लाख रु ची मागणी केली होती. त्यांची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री देशमुख यांनी औसा तालुक्यांकडे विशेष लक्ष देत भरीव प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. तालुक्यांतील अनेक गावांना मोठ्या प्रमाणात रस्ता व पुलांची समस्या दूर व्हावी यासाठी औश्याचे भूमिपुत्र श्रीशैल उटगे सतत पाठपुरावा केला होता. त्या हसेगाव येथील सिमेंट रस्त्यांचे दि 26 जानेवारी 2023 रोजी लातूर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य श्रीशैल्य दादा उटगे यांच्या निधीतून हासेगाव मध्ये सिमेंट काँक्रेट रस्ता मंजूर झालेल्या रस्ता तयार होऊन झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य व हात से हात जोडो अभियानाची सुरुवात मा. श्रीशैल दादा उटगे यांच्या शुभहस्ते औसा तालुक्यात हसेगाव गावापासून करीत सिमेंट रस्त्यां कामाचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते नारळ व रेबिन कापून करण्यात आले, यावेळी श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे केतकी संगम ऍग्रो प्रोडूसर चे चेअरमन बालाजी बावगे हसेगाव चे सरपंच शालुबाई राठोड,उपसरपंच सलीम शेख औसा तालुका काॅग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी,शहराध्यक्ष शकील शेख, रविकांत पाटील,अॅड पांडूरंग शिवलीकर, सुशिल पाटील,विक्रम गरड जिल्हा परिषद गट सर्कल समन्वयक अजहर पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने काॅग्रेस पक्षांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.