रत्नाकर औसेकर मित्र परिवाराच्या वतीने दिव्यांगांना ५५ व्हील चेरअरचे मोफत वाटप करण्यात आले
लातूर . २८
आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर व मित्र परिवार लातूर यांच्या वतीने २६ जानेवारी २०२३ रोजी दयानंद सभाग्रह , लातूर येथे गरजू दिव्यांगांना १०० व्हीलचेअर वाटपाच्या संकल्पापैकी पहिला टप्पा म्हणून ५५ व्हीलचेअर मोफत वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व प्रेरणास्थान माजी खासदार डॉ . गोपाळराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून त्यांच्याच हस्ते ५५ दिव्यांगांना मोफत व्हील चेअरचे वाटप करण्यात आले .
या प्रसंगी मित्र परिवार तसेच शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर , व्यापारी , उद्योजक , तसेच रामानुज रांदड , रामेश्वर बद्दर , जयंत काथवटे , बाबुआपा सोलापुरे अनेक स्नेहीचे उपस्थिती होती . या उपक्रमास डॉ . गोपाळराव पाटील , डॉ . अशोक कुकडेकाका , माजीमंत्री दिलीपराव देशमुख , माजीमंत्री आ . अमित देशमुख , माजीमंत्री आ . संजय बनसोडे , डॉ . जनार्धन वाघमारे , आ . रमेश कराड , आ . अभिमन्यू पवार ,डॉ .अशोक पोद्दार , माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे ,सीए. शाम धुत , प्रकाश रेड्डी , डॉ . काळगे , डॉ . कानडे , डॉ . भातांब्रे डॉ . विश्वास कुलकर्णी यांनी शुभेच्या दिल्या .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.