विठ्ठल नामाचा गजरात नाथ संस्थानची माघवारी पायी दिंडी पंढरपूरला रवाना
औसा (प्रतिनिधी) दि.23
माघ शुद्ध एकादशीच्या पायी दिंडीचा मान औसा येथील नाथ संस्थानला असल्यामुळे संस्थांचे पाचवे पिटाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली व पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 23 जानेवारी सोमवारी दुपारी 3.वा. वाजता श्रीक्षेत्र गोपाळपूर येथून पावसाचे पंढरपूर माघ वारी पायी पालखी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला भागवत धर्माच्या पताका खांद्यावर घेऊन टाळ मृदंगाच्या निनादात विठ्ठल नामाचा गजर करीत हजारो भाविक भक्त पालखी सोबत पायी निघाले आहेत. औसा येथील गांधी चौकामध्ये नाथ संस्थानच्या दिंडीचे आगमन होताच नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अजिंक्य रणदिवे यांनी सद्गुरु गुरुबाबा महाराज यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतला सुमारे 175 किलोमीटर अंतर या पायी दिंडीचे असल्याने दिंडीमध्ये कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील हजारो भाविक महिला पुरुष भक्तीभावाने सहभागी झाले होते. सोमवार दिनांक 23 जानेवारी रोजी लातूर जिल्ह्याच्या परिसरातून अनेक दिंड्या या पालखी दिंडी सोबत सहभागी झाल्या सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांचे शहरातील मान्यवरांनी ठीक ठिकाणी स्वागत करून दिंडीस शुभेच्छा दिल्या बोरफळ, बेलकुंड, उजनी, मार्गे केशेगाव येथून ही दिंडी उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करणार असून माघ शुद्ध एकादशीच्या विठ्ठल दर्शनासाठी हजारो भक्तगण पायी पालखी दिंडीत उत्साहाने सहभागी झाले आहेत औसा शहरातून या पाळी पालखी दिंडी मुळे शहरातील मुख्य रस्ता भाविक भक्तांनी फुलून गेला होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.