"डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय योगदान" पुरस्काराने सौ.दीपशिखा धिरज देशमुख सन्मानित
लातूर :-- "रीड लातूर" या अभिनव अशा उपक्रमाच्या माध्यमातून समाजात वाचनाची आवड जोपासली जावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी,इंग्रजी व हिंदी भाषेतील दर्जेदार बाल साहित्यांची पुस्तके वाचायला मिळावीत यासाठी करत असलेल्या प्रयत्ना बद्दल सौ.दीपशिखा धिरज देशमुख यांना नुकताच राजभवन मुंबई येथे राज्यपाल महोदयांच्या हस्ते "डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय योगदान" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
धम्मदान ट्रस्ट मुंबई व 'परफेक्ट वूमन' मासिका तर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या मान्यवरांना राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये सौ.दीपशिखा धिरज देशमुख यांचा समावेश आहे.
सदरील पुरस्कार हा "रीड लातूर" उपक्रमात सहभागी सर्व शिक्षक मंडळींच्या कार्याचा गौरव आहे व "रीड लातूर"या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्य करण्याची अधिकची ऊर्जा या पुरस्कारामुळे प्राप्त झाली असल्याची भावना सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.