किनगांव मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गोरख भुसाळे व उपाध्यक्षपदी असलम शेख तर सचिवपदी जाकेर कुरेशी यांची निवड
लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न किनगाव मराठी पत्रकार संघाची बैठक २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रजासत्ताकदिनी किनगांव मराठी पञकार संघाच्या कार्यालयात पञकार अफजल मोमीन याच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होऊन नूतन कार्यकारणीची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली या कार्यकारणीच्या अध्यक्षपदी गोरख भुसाळे यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी असलम शेख तर सचिवपदी जाकेर कुरेशी यांची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारणीत सहसचिव अनवर बागवान, कोषाध्यक्ष प्रा.बालाजी आचार्य, कार्याध्यक्ष अफजल मोमीन,कार्यालय प्रमुख शेटीबा श्रंगारे,तर सदस्य पदी प्रा.रत्नाकर नळेगावकर,संजिवकुमार देवनाळे,जेष्ठ पत्रकार पंडीतराव बोडके,प्रा.डॉ दगडू सिरसाठ,बालाजी गायकवाड,शामराव सावंत यांची निवड करण्यात आली.यावेळी नूतन अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि सचिव यांचा सत्कार माजी अध्यक्ष शेट्टीबा श्रंगारे,सामाजिक नेते धम्मानंद कांबळे,अफजल मोमीन ,प्रा बालाजी आचार्य,राजकुमार बोडके,विरभद्र शेळके,रतन सौदागर,बाळु आमले,रोकडोबा भुसाळे,मोहन शेळके,मोहन बने,विधान वाहूळे,अजय सोळंके,अंकुश येरमुळे,आदींनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या निवडी बद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
फोटो- १ ) उपअध्यक्ष असलम शेख,
फोटो- २ ) अध्यक्ष- गोरख भुसाळे,
फोटो- ३ ) सचिव - जाकेर कुरैशी,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.