महिलांना संघटीत करुन आर्थिक विकासाला गती देऊ - आ. अभिमन्यू पवार
महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी उद्योगांना चालना देणार - आ. अभिमन्यू पवार.
औसा : महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योगांना चालना देणार देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक ती मदत मिळवून देण्याची ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे. ते मकरसंक्रांतीच्या निमित्ताने भाजप महिला मोर्चाच्या वतीने आयोजित हळदीकुंकू व बक्षीस वितरण समारंभ बोलताना दिली आहे.
औसा येथे (दि.२८) रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की औसा शहराला माकणी धरणातून कायम स्वरुपी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करुन शहरवासीयांचा पाण्याचा कायमस्वरुपी प्रश्न सोडविला. शहराचा वाढता विस्तार व वर्दळ लक्षात घेऊन औसा शहराला बायपास रस्ता आणि शहरात १४ सुसज्ज स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यासाठी पाठपुरावा करून मंजूरी आली.औसा शहराच्या मुख्य रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेत तिथे रस्ता या अभियानातून शेतरस्ते कामाचे जाळे निर्माण केले. मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड, शेततळे, जनावरांचे गोटे, सिंचन विहिरी आदी विविध योजनेतून लाभ देण्यात आला.असे सांगून महिलांनी उद्योजक म्हणून पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. १७ ते २७ जाने २०२३ या कालावधीत महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामधील विजेत्या महिलांना आमदार अभिमन्यू पवार व सौ. शोभाताई अभिमन्यू पवार यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना उभारी देण्याचे काम सुरू असून महिलांना किमान कौशल्यावर आधारित रोजगार निर्मितीसाठी येणाऱ्या काळात सुसज्ज महिला भवन देण्यात येईल.असे आश्वासन सौ. शोभाताई अभिमन्यू पवार व भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष सौ. जयश्री घोडके यांनी दिले.
याप्रसंगी नगरपरिषदेचे गटनेते सुनिल उटगे,प्रा. सुधीर पोतदार, प्रविण कोपरकर, सौ. कल्पनाताई डांगे, अॅड. मोहिनी पाठक, प्रा. सोनाली गुळविले, सौ. विजयमाला रणदिवे, सौ. कल्पना ढविले, सौ. शरयू कारंजे, सौ. अनुपमाताई धाराशिवे, प्रा. पूजा बेडजवळगे, सौ. योगेरी उटगे, सौ. पूनम मुवा, सौ. वैशाली राचट्टे, डॉ. संध्या जाधव, सौ. मनिषा फुटाणे, सौ. संगिता कांबळे, सौ. सविता कारंजे, सौ. रंजना कुलकर्णी, सौ. शिल्पा कुलकर्णी, सौ. रुपालीधानुरे, सौ. ऐश्वर्याराचट्ट, सौ. स्वप्नाली वागदरे, सौ. भागिर्थी किरवे, सौ. शितल इनानी, सौ.पूनमताई मजगे, सौ. ज्योती हालकुडे, सौ. स्वाती शिंदे, सौ. ज्योत्सना पाठक, सौ. शुभदा जोशी आदीसह महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. स्वाती जोगदंड यांनी केले.
.... फोटो....
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.