अजीम हायस्कुल मध्ये
अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न
विध्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांना विज्ञानाची गोडी लागावी हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन शासन निर्देशानुसार अजीम हायस्कुल औसा मध्ये अपूर्व विज्ञान मेळावा यांचे आयोजन 07 फेब्रु.2023 रोजी करण्यात आले. या मेळाव्याचे उदघाटन मुख्याध्यापक श्री. निजामोद्दीन शेख साहेब यांच्या शुभ हस्ते पर्यवेक्षक केसरे सर, डॉ. सिद्दीकी सर, शेख टी. एम. सर यांच्या उपस्थित्त करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचलन पठाण समीर सर यांनी केले.
अपूर्व विज्ञान मेळाव्यात पाचवी ते नववी च्या विध्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मेळाव्यात वैज्ञानिक प्रयोग, चित्र प्रदर्शन. विज्ञान रांगोळी असे नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आले.
या मेळाव्यात हायड्रोलीक तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग, ह्रदयाची रचना प्रतिकृती, श्वसन संस्था. पचन संस्था ची रचना व कार्य, हवेच्या दाबावरील प्रयोग, रॉकेट, तुळशीचे महत्व, सौरऊर्जा, पवन ऊर्जा अशा विविध प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.
मुख्याध्यापक साहेबांनी विध्यार्थ्यांकडून विविध वैज्ञानिक संकल्पना समजावून घेतल्या आणि बाल वैज्ञानिकांचे कौतुक केले.
अपूर्व विज्ञान मेळावा यशस्वी होण्यासाठी विज्ञान प्रमुख दुरुगकर मॅडम, माशाळकर सर, कोळपे सर, इरफान पटेल सर, कोव्हाळे सर, सय्यद आसेफ सर, देशमुख मॅडम, अमरीन मॅडम, गुलनाज मॅडम व सर्व सहकारी शिक्षक व विध्यार्थ्यानी विशेष प्रयत्न केले,शेवटी उपस्थित्यांचे आभार इरफान पटेल सर यांनी मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.