🇮🇳 स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव 🇮🇳
स्वातंत्र्य सेनानी भाग २२ ) भारतरत्न डॉ. जाकीर हुसेन इंग्रजांच्या गुलामगिरीतुन आम्ही मुक्त झालोत स्वातंत्र्यसेनानी यांनी आपल्या जिव, व कुटुंब, याची पर्वा न करता स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक यांनी बलिदान व योगदान दिले हा इतिहास आहे हा इतिहास युवकांना प्रेरणादायी ठरावा या उद्देशाने भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव सोशल मीडियावर आपली परवानगी न घेता पोस्ट करत आहोत जास्तीत जास्त हे आदर्शवादी विचार आत्मसात व्हावे हाच संदेश संग्रहित
पोस्ट शेअर करण्यास परवानगीची गरज नाही 🙏
शतकातील महान शिक्षणतज्ज्ञ, स्वतंत्रता सेनानी भारतरत्न डॉ झाकीर हुसेन
डॉ. झाकीर हुसेन साहेबांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 रोजी हैदराबाद येथे झाला. त्याचे वडील हैदराबाद मध्ये वकील होते. �आयन डेक्कन� या लॉ मॅगझिनचे संपादन सोबत. त्याचे पूर्वज अफगाणचे शूर सैनिक होते. पण झाकीर साहेबांचे वडील फिदा हुसेन खान यांनी ही परंपरा मोडून वकिली करण्यास सुरवात केली. झाकीर हुसेन यांच्या वडीलाचे निधन झाले तेव्हा ते फक्त 9 वर्षांचे होते. 1907 मध्ये त्याचे कुटुंब इटावा येथे पोचले. झाकीर साहेब आपल्या तीन भावासोबत इस्लामिया हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. झाकीर साहेब 1923 मध्ये अलिगड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम ए करून जर्मनीला गेले. त्यांनी बर्लिन विद्यापीठातून इकॉनॉमिक्स विषयात पीएचडी केली झाकीर साहेब तेथील विद्यार्थी असताना अलिगड विद्यापीठाला पूर्वी मोहम्मदन एंग्लो ओरिएंटल कॉलेज म्हटले जात असे. त्यावेळी गांधीजींनी तेथील विद्यार्थी व शिक्षकांना संबोधित केले. गांधीजी म्हणाले होते की ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या शैक्षणिक संस्थांवर भारतीयांनी बहिष्कार टाकावा. त्याचा परिणाम झाकीर हुसेनवरही झाला. त्यांनी अलीगढमध्ये मुस्लिम राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्यास मदत केली आणि 1935 मध्ये नंतर दिल्लीला हलविली तसेच 1948 पर्यंत त्याचे कुलगुरू राहिले.
आपण युनिव्हर्सिटीचे माध्यमातून स्वतंत्रता चळवळी मध्ये अथक परिश्रम करत होता. आपण 1930 च्या नॅशनल मूव्हमेंट मध्ये सहभागी होते. पण हकीम अजमल खान आणि महात्मा गांधी यांच्याशी फार जवळीक संबंध होते.
युनिव्हर्सिटीचे व्हाईस चांसलर असताना देशाच्या फाळणी संदर्भात मुस्लिम लीगच्या विचाराचा जबरदस्त विरोध केला
गांधींची मूलभूत शिक्षणाची दृष्टी झाकीर हुसेन यांनी क्रमाने विकसित केली. त्याने जामिया मिलियाला नमुना बनविले. 1967 मध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर डॉ. हुसेन म्हणाले की, 47 वर्षांपासून राष्ट्रीय शिक्षणाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला देशातील लोकांनी इतका मोठा सन्मान दिला आहे. मी माझे मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे गांधीजीं यांच्या सोबत जीवनाची सुरुवात केली. त्यांना सुरुवातीपासूनच शिक्षणाशी खूप आवड होती, त्यादृष्टीनेच गांधीजींनी 1937 मध्ये शिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय शिक्षण आयोगाचे अध्यक्ष केले. नंतर, झाकीर हुसेन यांनी गांधीजींनी कल्पना केलेल्या मूलभूत शिक्षणाच्या हळूहळू विकासास प्रोत्साहित केले.
हुसेन 1948 मध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलपती झाले आणि चार वर्षांनंतर त्यांनी राज्यसभेत प्रवेश केला.
1954 मध्ये त्यांना पदमभूषण ने सन्मानित करण्यात आले.
1956-58 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्र शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती संघटनेच्या (युनेस्को) कार्यकारी समितीवर काम केले.
1957 मध्ये त्यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आणि 1962 मध्ये त्यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.
1963 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1967 मध्ये ते काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय राष्ट्रपतीपदी निवडले गेले आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी काम केले.
राष्ट्रपती होण्याच्या उद्घाटन भाषणात ते म्हणाले होते की संपूर्ण भारत माझे घर आहे आणि तेथील सर्व रहिवासी माझे कुटुंब आहेत. 3 मे 1969 रोजी त्यांचे निधन झाले. ते देशाचे पहिले राष्ट्रपती होते ज्यांचे पदावर असताना निधन झाले.
ज्या जामिया मिलियामध्ये आपण 1926 ते 1948 पर्यंत कुलगुरू होते त्याच संस्थेच्या परिसरात आपल्याला विश्रांती देण्यात आली.
संदर्भ -1) IMMORTALS
लेखक sayyad naseer ahmad (9440241727)
2) जंग ए आजादि और मुसलमान
..........
संकलन तथा अनुवादक
अताउल्ला पठाण सर
टूनकी, बुलढाणा महाराष्ट्र,
मो. 9423338726
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.