मोगरगा येथे केदारलिंग विद्यालयाचे एम एम एस परीक्षेत उज्वल यश...
औसा प्रतिनिधी:-राम कांबळे
औसा तालुक्यातील मोगरगा येथील केदारलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये इयत्ता पाचवी व आठवी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2022 23 या वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या एमएमएस परीक्षेत उज्वल यश संपादन केले विद्यालयाचे सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये सर्वप्रथम महेश चांदोरे महेश्वरी महामुरे पायल लकडे सुरज चांदुरे श्वेता भालेराव या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत केदारलिंग विद्यालयाचा नावलौकिक केला आहे या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सोनवणे मुख्याध्यापक विवाह सोनवणे सहशिक्षक दिनकर निकम यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.