*02 लाख 16 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त. गुन्हा दाखल. पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
त्याप्रमाणे अवैध धंद्याची माहिती काढत असताना पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, लातूर शहरातील गंजगोलाई परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकात असलेल्या एका किराणा दुकानातून एक इसम प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री व्यवसाय करीत आहे. साठवणूक करीत आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अमलदारांच्या पथकाने दिनांक 14/02/ 2023 रोजी दुपारी 5 वाजण्याच्या अण्णाभाऊ साठे चौकातील कावळे प्रोव्हिजन अँड किराणा दुकानात छापा मारून दुकानातून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे,महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण 02 लाख 16 हजार 680 रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू जप्त करण्यात आले आहे.
त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे नाईक पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ हाजबे यांच्या तक्रारीवरून प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारा व कावळे प्रोव्हिजन अँड किराणा दुकानाच्या मालक इसम नामे
1) विठ्ठल माणिकराव कावळे, वय 42 वर्ष, धंदा व्यापार, राहणार आनंदनगर, लातूर.
याचे विरुद्ध पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 75/ 2023, कलम 188, 272, 273,328 भा.द.वि. याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्याच नमूद गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून 02 लाख 16 हजार 680 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कवाळे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, नवनाथ हसबे , मोहन सुरवसे, नितीन कठारे, नकुल पाटील यांनी पार पाडली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.