लोकाधिकार विद्यार्थी संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.*

 *लोकाधिकार विद्यार्थी संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.* 






लातूर प्रतिनिधी;---

    लातूर लोकाधिकार संघ अंतर्गत लोकाधिकार विद्यार्थी संघ आणि लोकाधिकार युवक संघ  नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार लोकाधिकार विद्यार्थी संघाच्या संपर्क कार्यालयात दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झाला. 

लोकाधिकार विद्यार्थी संघाचे नवनियुक्त लातूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भास्कर शिंदे आणि लोकाधिकार विद्यार्थी संघाचे नवनियुक्त चाकूर तालुका अध्यक्ष विकास विश्वनाथ तोंडारे यांचा सत्कार लोकाधिकार संघाचे श्री संतोष पनाळे यांच्या हस्ते करण्यात आला.  

सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना संतोष पनाळे यांनी लोकाधिकार संघाविषयी माहिती देऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या सत्कार समारंभ प्रसंगी शिवाजी धरणे सर, श्रीकृष्ण सूर्यवंशी, बालाजी राठोड, मयूर गोपाळघरे, रोहित गायकवाड, रमेश पवार, आकाश बारगजे, विवेक गर्जे, निलेश पवार, पांडुरंग घोडके, लक्ष्मण भुरे, संजय मोरेश्वर, शिवशंकर लोहार, सौरभ पाटील, सुरज पेठकर, शुभम पाटील, कार्तिक काकडे, अभिषेक यादव, माधव जोशी, राम शिंदे, धीरज नरवणे, अविनाश शेळके, आदी उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी राठोड यांनी केले. तर उपस्थित सर्वांचे कृष्णा सूर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या