*राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेमध्ये अथर्व मोठे यांचे यश
औसा प्रतिनिधी -राजे शिवछत्रपती ग्रुप आशिव यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अथर्व चंद्रशेखर मोठे या विद्यार्थ्याने वैयक्तिक नृत्य स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले आहे. राजे छत्रपती युवा ग्रुप आशिव यांच्या वतीने छत्रपती शिवराय जन्मोत्सवानिमित्त आयोजित भव्य नृत्य स्पर्धेमध्ये किशोरवयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणाला वाव मिळावा म्हणून व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.या स्पर्धेमध्ये अथर्व चंद्रशेकर मोठे या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवून स्मृतीचे नव 2100 रुपयाचे रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र पटकाविले आहे. अथर्व मोठे यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. अथर्व मोठे यांच्या यशाबद्दल प्रा बालाजी धानुरे, औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, सचिव महेबूब बक्षी, सहसचिव विनायक मोरे, कोषाध्यक्ष इलियास चौधरी, उपाध्यक्ष रोहित हंचाटे व बालाजी उबाळे, कार्यकारणी सदस्य रमेश दूरकर, संजय सगरे, राम कांबळे विश्वनाथ गुजोटे पत्रकार एस ए काझी सामाजिक कार्यकर्ते बालाजी शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.