औशांचे ग्रामरोजगार सेवक धरणे आंदोलन संपन्न,पण कामबंद सुरूच
अनेक संघटना, ग्रामपंचायत,ग्रामसेवक युनियन,चा आंदोलनास पाठिंबा
औसा प्रतिनिधी
रोजगार हमी योजनेचा महत्वाचा कणा असणाऱ्या रोजगार सेवकांवर आता स्वतःच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघटनेच्या माध्यमातून पंचायत समिती समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन शांततेत पार पडले सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ,आपल्या मागण्या शासन दरबारी पोहचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे संघटनैच्या माध्यमातून सांगण्यात आले.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक महत्त्वाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्राम रोजगार सेवक महत्त्वाची भुमिका पार पाडतात. ग्रामपंचायत स्तरावर ग्राम रोजगार सेवकांचे काम हे अत्यंत महत्त्वाचे असून ग्रामरोजगार सेवकांच्या प्रश्नांसंबंधी वेळोवेळी मागण्या करूनही ग्रामरोजगार सेवकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. सत्ताधारी पक्षांतील औशाच्या आ. पवार यांना वेळोवेळी मागणी करूनही त्यांनी दखल घेतली नसल्याने आज ग्राम रोजगार सेवक यांच्यावर आपल्या हक्काच्या न्याय मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्याची वेळ महाराष्ट्राला रोहयो तून दिशा देणारा हा तालुका आहे याच्यावर ही आली आहे. औसा तालुक्यातील रोजगार सेवक पंचायत समितीचे सर्व ग्रामरोजगार सेवक आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी गुरुवारी 9 फेब्रुवारी2023 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. त्या आंदोलन यशस्वी पणे संपन्न झाले परंतू जोपर्यंत यांच्या मागण्या मध्ये ग्रामरोजगार सेवक हे पद पुर्णवेळ करत फिक्स मानधन देण्यात यावे, मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रवासभत्ता,सादील, अल्पोपहार भत्ता देण्यात यावी,15मार्च ते 31 मार्च 2021महिन्यातील मानधन आजपर्यंत मिळाले नाही ते तात्काळ देण्यात यावे.NMMS हजेरी साठी मोबाईल फोन व त्यासाठी लागणारे रिचार्ज देण्यात यावे.
यासह अनेक प्रलंबीत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत काम बंद करत राहणार असून त्यांच्या संबंधी निवेदन गटविकास अधिकारी देण्यात आले आहे. रोजगार सेवक यांच्या मागण्या संदर्भात आजच्या धरणे आंदोलनास नरेगा कर्मचारी युनियन,तांत्रिक अधिकारी युनियन व आपरेटर युनियन, ग्रामसेवक युनीयन चे तालुकाध्यक्ष बिराजदार एस.एच सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष विष्णू महाराज कोळी,बाळासाहेबांची शिवसेना औसातालुका प्रमुख गणेश माडजे,संभाजी सेनेचे तालुकाध्यक्ष मनोज गरड, प्रहार संघटनेचे आनंदगावकर ,छावा मराठा ग्रुप चे नागेश मुंगळे शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र मोरे,मनसे चे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नांगराळे,यांच्या सह काळमाथा,भादा,दावतपुर,वडजी,कान्हेरी, बेलकुंड,यांच्यासह बहुतांश गावाच्या अनेक ग्रामपंचायत यांनी पाठिंबा दर्शवत आंदोलनात रोजगार सेवक यांच्या सोबत राहु असे आश्वासन दिले. यावेळी अनेकांनी भाषणे करीत आपले मनोगत व्यक्त केले.या आंदोलनास तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार सेवक,सरपंच उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.