अतिरिक्त एमआयडीसी साठी संपादित जमिनीचा शेतकर्यांना वाढीव मावेजा मिळवून देण्याची महाराष्ट्र शासनाने भूमिका घ्यावी.
लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या नेतृत्वात शेतकर्यांचे जिल्हाधिकार्यांमार्फत शासनाला निवेदन.
लातूर प्रतिनिधी;-
लातूर शहरालगत असलेल्या हरंगुळ (बु.), खंडापूर आणि चिंचोलीराववाडी येथील सुमारे ४५० पेक्षा ज्यास्त शेतकर्यांच्या शेतजमिनी अतिरिक्त एमआयडीसी प्रकल्पात १९९८ साली संपादित केले आहेत. अत्यंत तुटपुंज्या म्हणजे ८० पैसे ते १ रुपये २० पैसे प्रति चौरस फूट दराने संपादित करून शासनाने घेतल्या. सदरचे शेतकरी भूमिहिन झाले असून उध्वस्त झाले आहेत. या शेतकर्यांना वाढिव मावेजा देण्यात येवून एमआयडीसीत त्यांना भूखंड देण्यात यावा, या मागणीसाठी दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजी लोकाधिकार संघाचे संस्थापक लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३०० पेक्षा अधिक शेतकर्यांनी लातूरच्या जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
सदर शेतकर्यांनी तुटपुंजा मावेजा मिळाल्याने लातूर न्यायालयात धाव घेतली होेती होती, तेव्हा त्यांना ७ रुपये ते ४५ रुपये प्रति चौरस फूट प्रमाणे मावेजा देण्याचा निकाल दिला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ८० पैसे ते १ रुपया २० पैसे मावेजा देण्याचे आदेश दिल्याने शेतकर्यांना तुटपुंजा मावेजा मिळाला आहे. त्यातूनही वकिलांची फिस, स्टँम्प डयूटी व इन्कम टॅक्सला अमाप पैसा गेला आहे. तरी महाराष्ट्र शासनाने सदर शेतकर्यांना वाढिव मावेजा मिळवुन देण्याबाबतची भूमिका घ्यावी, अशा मागणीचे निवेदन लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना देण्यात आले आहे.
यावेळी लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे, प्रदिप पाटील खंडापूरकर, अमरकांत कैले, लोकाधिकारचे जिल्हाप्रमुख विरनाथ आंबुलगे, उपजिल्हाप्रमुख माधवराव तोंडारे, शाम बरुरे, विठ्ठल आयलाने, विष्णूदास पाटे, पप्पू तिगीले, हरिश्चंद्र बरुरे, अभिमन्यू गवळी, शिवाजी सरवदे, विवेक मद्दे, बप्पा टेळे, सुरेश मसके, संतोष पडिले, अक्षय कैले, दिलीप चामे, नागनाथ बंडगर, शत्रगुण बंडगर, संतोष पनाळे, पुरुषोत्तम पाटे, भरत सरवदे, बालाजी पनाळे, जनार्धन कैले, महेश वलसे, दत्तू चामे, गहिनिनाथ सुडे, जगन्नाथ सुडे, लाडलेसाब सय्यद, मैनुभाई सय्यद, लक्ष्मण चामे, नागनाथ वलसे, काका बोके, चंद्रकांत आयलाने, शब्बीर कबाडे, भागवत वलसे, अनिल कोतवाड, बशीर शेख, बंकट वाघमारे, अजय शेळके, जनाधन वलसे, संतराम चामे, शाम बोके, लक्ष्मण जाधव, अक्षय केले, निलेश चामे, दिलीप, प्रल्हाद चामे, काका बोके, इरफान सय्यद, मोहन मस्के, राम कैले, नागनाथ चामे, ईलाही सय्यद, नवनाथ चामे, भागवत वलसे, राम केले, जनार्दन वलसे, संतराम चामे यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.