*तलवारीने केक कापून वाढदिवसाचे सेलिब्रेशन, बर्थडे बॉय सह 7 जनाविरुद्ध गुन्हा दाखल.*
लातूर रिपोर्टर न्यूज़
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस ठाणे विवेकानंद चौक च्या हद्दीत काही दिवसापूर्वी तरुणांनी एकत्र येऊन बर्थडेचा केक तलवारीने कापला असून काही तरुण तलवारी बाळगून आहेत,अशी गोपनीय माहिती पोलीस ठाणे विवेकानंदचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांना मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पुढील कायदेशीर कारवाई करीता पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेऊन त्यांना आज दिनांक 07 /02/ 2023 रोजी अटक केली आहे.
या प्रकरणी आरोपींवर पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 92/ 2023 कलम 4 ,25 भारतीय हत्यार कायदा सह कलम 188, 34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वाढदिवसा निमित्ताने कृपासदन रोडवर सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून जल्लोष केल्याबद्दल पोलिसांनी सात जनाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची कारवाई केली असून त्यांच्याकडून दोन लोखंडी तलवारी व एक कत्ती जप्त करण्यात आली आहे .
सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी, लातूर यांच्या जमाबंदी व शस्त्रबंदीचे आदेश असतानाही सदर आदेशाचे उल्लंघन करून तसेच धारदार शस्त्र जवळ बाळगून भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांच्या विविध कलमांचे उल्लंघन करून अपराध केल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे निर्देशानुसार वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक श्री.सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील पोलीस पथकाने कारवाई करुन आरोपी नामे
1) जव्वाद अजमद देशमुख,वय 22 वर्ष, धंदा मजुरी रा. गाझीपुरा, लातूर.
2) वशीम खलील शेख, वय 22 वर्ष, रा. गाझीपुरा, लातुर.
3) मेहताब माजीद शेख,वय 18 वर्ष, रा.तुळजापुरे, नगर लातुर.
4) अफताफ उर्फ अरबाज शेरखान पठाण, वय 21 वर्ष, रा. गाझीपुरा लातुर.
5) अबरार अरशद देशमुख, 23 वर्ष, रा. गाझीपुरा लातुर.
6)अतुल्ला अस्लम देशमुख, रा. गाझीपुरा लातुर (फरार)
7) साहील सिकंदर शेख ,
हाते नगर, लातुर (फरार).
यांचे विरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून लोखंडी कत्ती व दोन तलवारी जप्त करण्यात आल्या असून पाच आरोपींना अटक करण्यात आली असून इतर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.
*पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात गेल्या काही महिन्यापासून सोशल मीडियावर घातक शस्त्र घेऊन व्हिडिओज,रिल, इमेज अपलोड करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात येत असून आतापर्यंत 182 इतक्या अल्पवयीन मुलांनी घातक शस्त्रासह सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट हटविण्यात आले असून नमूद अल्पवयीन मुलांच्या पालकांना संबंधित पोलीस ठाण्याला बोलावून घेऊन समज देण्यात आलेली आहे. व काही प्रौढ तरुणावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत.*
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस अमलदार रामचंद्र गुंडरे, मुनवरखान पठाण, मुन्ना नलवाड, खंडू कलकत्ते, रमेश नामदास, अझर शेख यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.