पं. जगताप गुरुजींच्या भैरविणे
भजन गायन स्पर्धेची सांगता
औसा प्रतिनिधी
दि. 3 मार्च 2023
वेदशास्त्र ती गाईला पुराणी, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती या अभंगाबरोबरच हेचि दान देगा देवा तुझा विसर न पडावा या सुमधुर भैरविणे पं. विठ्ठलराव जगताप यांनी राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धेची सांगता केली.
औसा येथील माऊली प्रतिष्ठानच्या वतीने मुक्तेश्वर मंदिरात शनिवार व रविवारी राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन पं. शिवरुद्र स्वामी, मुक्तेश्वर देवस्थानचे कोषाध्यक्ष,अड. बी. एस. कारंजे, धनंजय कोपरे, उमकांत मुर्गे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
यावेळी बाल गट आणि खुला गटातील स्पर्धेत 102 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत अविनाश यादव, ईश्वरी जोशी, सुजित माने, सुनीता अवधूत, परमेश्वर सूर्यवंशी, संध्या कुटवाडे, ज्ञानदेव लोकरे, गवळणबाई बनसोडे ,अनन्या जाधव, समीक्षा हुरदळे, सिद्धी आजने, रामेश्वरी दिवाण, कांचन भिसे, स्वरा पाटील, अथर्व घाडगे, अदिती जाधव, श्रद्धा गवळी, रितेश कदम, श्रुती कुटवाडे आणि स्वराली भोजराज असे एकूण एकवीस स्पर्धक बक्षीसाचे मानकरी ठरले.
या स्पर्धेत पं. रमेश भुजबळ,पं. भाऊसाहेब रायते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या कार्यक्रमात पं. शिवरुद्र स्वामी, शंकर जगताप, विश्वनाथ धुमाळ, अविनाश यादव, दिनेश पोखरकर आदी कलावंतांनी हार्मोनियम आणि तबला साथसंगत केली.
विजयी स्पर्धकांना विजयकुमार मिटकरी, नरसिंग राजे, गजेंद्र जाधव, हणमंत लोकरे, व्यंकटराव राऊतराव, शामभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. युवराज हालकुडे यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.