*स्वातंत्र लढा*
*काळा पाणी*
*स्वातंत्र्य आंदोलनातील हे खरे स्वातंत्र्य वीर मुसलमान*
१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतल्यामुळे मौलाना याहया अली, मौलाना अहेमदुल्लाह अजीमाबादी, मौलाना अब्दुलकादर लुधयानवी, मौलाना फजलुलहक खैराबादी, मौलाना अब्दुल रहीम सादिकपुरी, मौलवी मुहमंद जाफर थानेसरी इत्यादींना इंग्रज सरकारने काळया पाण्याची शिक्षा ठोठावली व त्यांना काळया पाण्याच्या शिक्षेकरीता अंदमानला पाठविण्यात आले. यातील मौलाना याहयाअली, मौलाना अहेमदुल्लाह व मौलाना फजललहक खैराबादी यांचा याच अंदमान तुरुंगात मृत्यू झाला तर मौलाना मुहमद जाफर अंदमान बेटात १८ वर्षाची शिक्षा भोगत असताना ब्रिटिश सरकारने त्यांचे घर त्यांची संपत्ती जप्त केली. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेल्या सुमारे तीन हजार मुस्लिम भारतमातेच्या सुपुत्रांना जन्म ठेपेची शिक्षा देऊन त्यांना काळा पाण्यावर पाठविण्यात आले. यातील काही स्वातंत्र्यवीराने इंग्रज सरकारजवळ क्षमा याचना, माफी नामा दयेची भीक मागतली नाही.
१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात परकीय इंग्रजांची राजवट उलथून टाकण्यासाठी झालेल्या लढ्यात पाच लाख मुस्लिमांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. १८६० साली मौलाना शाहअब्दुल अजीम, मौलाना शाहअब्दुल्लाह, चौधरी शेख पंजाबी यांनाही जन्म ठेपेची शिक्षा देण्यात आली व त्यातच त्यांचा अंत झाला. १८८६ साली मौलाना मुहमद सादिकपुरी, मौलाना अब्दुल रहमान सादिकपुरी, काझीमियाँ, जान मिया अब्दुल गफार, मौलाना जफर थामेसरी यांनाही काळया पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली व य सर्वांना अंदमानात मारून टाकण्यात आले. १८७० साली राजा इब्राहिम मंडल यांना जन्म ठेप होऊन त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली. अशाप्रकारे काळया पाण्याची शिक्षा हजारों मुस्लिम क्रांतिकाराना ठोठावण्यात आली होती. परंतु त्यातील एकानेही शिक्षेला घाबरुन माफीनामा दया, याचना केलेली नाही. त्यांनी देश स्वतंत्र व्हावा म्हणून आजन्म कारावास भोगला. मृत्यूला कवटाळले परंतु आपल्या मातृभूमीशी गद्दारी केली नाही. त्यांच्यासाठी कुठल्याच सागरांचा प्राण तळमळला नाही. मात्र ते इतिहासात अमर झाले.
*मुजफ्फरभाई सय्यद
कोकण प्रदेश अध्यक्ष
छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड
९९६०३२५०५७*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.