पत्रकार भवनच्या दुरुस्ती व सुशोभीकरणास निधी द्यावा
रेणापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षांची पालकमंत्र्यांकडे मागणी
रेणापूर/प्रतिनिधी:रेणापूर येथील पत्रकार भवनाची दुरावस्था झाली असून त्याची दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी २०
लाख रुपयांचा निधी द्यावा,अशी मागणी रेणापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.
युती सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी या पत्रकार भवनच्या उभारणीसाठी निधी मंजूर केला होता.नंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दुसरा मजला बांधण्यासाठी निधी दिला.या दोन्हीतून पत्रकार भवनची भव्य वास्तू उभी राहिली.नंतरच्या काळात या इमारतीची दुरवस्था झाली आहे.तिची दुरुस्ती करून सुशोभीकरण करणे आवश्यक आहे.यासाठी अंदाजे २०लाख रुपयांचा निधी गरजेचा आहे. पालकमंत्र्यांनी या निधीस मंजुरी देऊन संबंधित विभागास तसे आदेश द्यावेत,अशी मागणी पत्रकार संघाचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली.ही मागणी लक्षात घेत पालकमंत्री महाजन यांनी लागलीच संबंधितांना तसे निर्देश दिल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.