स्थानिक गुन्हे शाखेची अवैध जुगारावर छापेमारी, 21 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 10 लाख 95 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त.*



*पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखेची अवैध जुगारावर छापेमारी, 21 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 10 लाख 95 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त.






लातूर रिपोर्टर 

                या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने  अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गजानन भातलवंडे यांनी  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन करून त्यांचे मार्फत लातूर जिल्ह्यातील  अवैध धंद्यावर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

             दरम्यान दिनांक 23/05/2023 रोजी काही इसम पैशावर तिर्रट जुगार खेळत आहेत अशी संबंधित पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पथकाने लातूर शहरातील गंगाधाम च्या पाठीमागील शेतामध्ये  छापेमारी करून बेकायेशीररित्या जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने एकूण 21 इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 10 लाख 95 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

          पोलीस ठाणे विवेकानंद चौक मध्ये खालील नमूद इसमाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चा कलम 12( अ ) कायद्यान्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


1) शेख हसन नजीर, वय 25 वर्ष, राहणार गौसपुरा लातूर.


2) महादेव बालाजी कांबळे, वय 26 वर्ष, राहणार माताजी नगर, लातूर.


3) फिरोज रशीद शेख, वय 28 वर्ष, राहणार चौधरी नगर लातूर.


4) जलील जानेमिया शेख,  29 वर्ष राहणार कवानाका, लातूर 


5) फय्युम अहमद कुरेशी, वय 34 वर्ष ,राहणार खोरे गल्ली लातूर.


6) इब्राहीम हमजा शेख, वय 28 वर्ष राहणार हिमायतनगर ,लातूर.


7) गोविंद ज्ञानोबा कदम ,वय 34 वर्ष राहणार कोल्हे नगर, लातूर.


8) भूषण सलीम पठाण, वय 18 वर्ष, राहणार हिमायतनगर, लातूर.


9) सादिक सत्तार शेख, वय 25 वर्ष, राहणार माताजी नगर, लातूर.


10) असलम खाजमीया शेख, वय 28 वर्ष, राहणार  म्हैसूर कॉलनी, लातूर.


11) महनोदीन सलीम शेख, वय 33 वर्ष, राहणार कापूर रोड लातूर.


12) किशोर शिवाजी हुलगुंडे, वय 28, वर्ष राहणार इंडिया नगर, लातूर.


13) विशाल सतीश कांबळे, वय 30 वर्ष, राहणार संत गोरोबा सोसायटी लातूर.


14)अनमोल रामराव हासनाळे, वय 25 वर्ष ,राहणार ज्ञानेश्वर नगर, लातूर


15) अमीर जब्बार शेख ,वय 26 वर्ष, राहणार बरकत नगर, लातूर.


16) अमजद बाबू पठाण ,वय 35 वर्ष, राहणार लातूर.( फरार )


17) पंकज अनिल शिंदे, वय 32 वर्ष, राहणार सिद्धेश्वर चौक, लातूर.( फरार )


18) मझर महबूब शेख, वय 25 वर्ष, राहणार इंडिया नगर, लातूर.( फरार )

 

19)सरफुद्दीन उर्फ शेरफू शेख वय 34, वर्ष राहणार पटेल नगर, लातूर.( फरार )


 20)पिराजी लष्कर, वय 30 वर्ष, राहणार वडारवाडी, वसवाडी लातूर.( फरार )


21) मंगेश सोनकांबळे, वय 32 वर्ष, राहणार लेबर कॉलनी, लातूर.( फरार )


              अशी असून यामधील  फरार इसमांचा पोलीस शोध घेत आहेत.


              पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 23/05/2023 रोजी लातूर शहरातील गंगाधाम च्या पाठीमागे शेतामध्ये केलेल्या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वातील  पथकामधील सचिन द्रोणाचार्य, पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव, पोलीस अंमलदार मोहन सुरवसे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, नानासाहेब भोंग  सचिन धारेकर, तुराब पठाण, जमीर शेख तसेच आरसीपी प्लाटून मधील कोळी, शिरसाठ, जाधव, रेड्डी, काळे, किनाळे, टेकाळे ,तोगरे यांनी सदरची कामगिरी केली आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या