कर्मचारी व अधिकारी यांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करता आले उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे

 कर्मचारी व अधिकारी यांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करता आले उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे









औसा प्रतिनिधी औसा तालुक्यातील महसूल विभागाचे कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी तसेच तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या सहकार्यामुळेच आपणास असा उपविभागांमध्ये चांगले काम करता आले आपल्या कार्यकाळामध्ये महसूल विभागाची 100% वसुली झाली लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुका महसूल विभागाच्या वसुलीमध्ये प्रथम आला याचा मला सार्थ अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी केले असा येथील प्रशासकीय इमारतीमध्ये बदली झाल्यामुळे आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार भरत सूर्यवंशी महसूल विभागाचे निवासी नायब तहसीलदार दत्ता कांबळे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे मंडळ अधिकारी निळकंठ जाधव यांची उपस्थिती होती याच कार्यक्रमांमध्ये नायब तहसीलदार प्रवीण आळंदीकर आणि उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांचा निरोप समारंभ आयोजित करून आवसा महसूल कर्मचाऱ्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी पुढे बोलताना अविनाश कांबळे म्हणाले की औसा तालुक्यामध्ये 2019 स*** झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने व कायदेशीर जबाबदारी पार पाडण्यासाठी चा उत्कृष्ट अनुभव मला मिळाला तर कोरोना काळामध्ये महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने टीम वर्क करता आले असेही त्यांनी यावेळी सांगितले अधिकारी म्हणून कसल्याही प्रकारचा गर्व न ठेवता आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या हातून काही चुका झाल्या तरी त्या समजावून घेऊन कामकाज होणे आवश्यक असते प्रत्येक वेळी कार्यवाही ची आवश्यकता नाही असेही सांगून त्यांनी औसा तालुक्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले यावेळी प्रवीण आळंदकर दत्ता कांबळे निळकंठ जाधव तलाठी अंबिका जोगदंड आणि महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राजुरे यांनीही शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी औसा तालुक्यातील तलाठी मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयातील सर्व महसूल कर्मचारी उपस्थित होते







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या