उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर जिल्हा पोलीस दलास 15 चारचाकी वाहने लोकार्पण.
लातूर रिपोर्टर न्यूज़
याबाबत थोडक्यात माहिती अशी की मा.पालक मंत्री व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांचे प्रयत्नामुळे आणि मा.जिल्हाधिकारी साहेब लातूर यांचेकडे मागणी केल्याप्रमाणे, तसेच पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे लातूर जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजन व विकास निधीतून जिल्हा विकास नियोजन मंडळाने दिलेल्या परवानगीनंतर 15 चारचाकी गाड्या प्राप्त झाल्या होत्या.
सदर वाहनांचे आज दिनांक 16 जून रोजी लातूर एअरपोर्ट परिसरात मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सदर वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर लातूर जिल्हा पोलीस दलाने सदर वाहनाचे छ. शिवाजी महाराज चौक, रेणापूर नाका,गंजगोलाई मार्गावर संचलन करण्यात आले.
*सदर वाहने लातूर जिल्हा पोलिस दलामध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे पोलिस दलात आनंदाचे वातावरण असून पोलीस दलाचे दैनंदिन कामकाजात, कायदा व सुव्यवस्थेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास त्यामूळे मोलाची मदत होणार आहे.*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.