लातूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या "ट्राफिक ॲम्बेसिडर" च्या माध्यमातून जनजागृतीला सुरुवात
लातूर रिपोर्टर न्यूज़
लातूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी व वाहतूक कोंडी संपण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे हे विविध उपायोजना राबवीत असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यातूनच लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये विविध सेवाभावी संस्था कडून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमाचे पालन करणे बाबत जनजागृती, पथनाट्याचे आयोजन करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होणाऱ्या परिणामाचे विविध प्रकारचे व्हिडिओ व इमेज तयार करून ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर प्रसारित करणे तसेच वेळोवेळी विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहन चालका विरोधात कठोर कारवाई करणे अशा प्रकारच्या कारवाया केल्या आहेत. वारंवार सूचना देऊनही काही वाहन चालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. अशा वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी लातूर शहरातीलच नागरिकांची मदत घेतली जाणार आहे.
पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे संकल्पनेतून लातूर शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी व वाहतूक नियमन सुरळीत होण्यासाठी विविध प्रकारे उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून "ट्राफिक अँबेसिडर" ही नवी संकल्पना राबविण्यात येत आहे यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना सोसायटीतील वाहनधारक नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर काय कारवाई होऊ शकते याची जाणीव या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये वाहतूक नियंत्रण करण्यासंदर्भात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा अभिनव उपक्रम असून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या कल्पकतेतून सदरचा उपक्रम राबविला जात असून दिनांक 19/06/2023 पासून याची सुरुवात झाली आहे.
ट्राफिक अँबेसिडर यांच्या मार्फतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे विविध वाहन चालकांना थांबवून त्यांनी केलेली चूक व त्याचे दुष्परिणाम याची माहिती देऊन "गांधीगिरी" करत त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.
लातूर शहरातील सुजान व ट्रॅफिक नियंत्रणाचे काम करणाऱ्या इच्छुक नागरिकांना लातूर जिल्ह्याच्या वेबसाईटवर आपली नावे नोंदवून त्यांनी आपल्याकडे आठवड्यात असलेला उपलब्ध वेळ कळविला त्यावरून त्या-त्या वेळेस त्यांच्या माध्यमातून शहरातील रस्ते, चौक, सोसायटी, गल्लीत नागरिकांत जनजागृती करण्यात येत असून लातूर पोलीस पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांना वाहतूक नियम संदर्भात प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामध्ये कायद्याबरोबरच वाहतुकीच्या तज्ञ पोलीस अधिकाऱ्यामार्फत मार्गदर्शन करून प्रशिक्षित केले गेले आहे.
एकंदरीत लातूर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी व लातूरकरांचा त्रास कमी करण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात लातूर शहर वाहतूक शाखा हे लातूर शहर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, अतिक्रमण विभाग तसेच विविध सेवाभावी संस्था यांच्याशी समन्वय साधून व त्यांची मदत घेऊन मोठ्या प्रमाणात उपायोजना करण्यात येत आहेत.
नागरिकांनीही प्रतिसाद देत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.