मोदी महा संपर्क अभियानात आमदार अभिमन्यू पवार नागरिकांच्या द्वारी
औसा प्रतिनिधी
भारत देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीस 9 वर्षे पूर्ण झाले आहेत. समाजातील तळ्या गळातील घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच शासकीय यंत्रणेतला भ्रष्टाचार कमी करून विविध योजनेचा लाभ लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले आहे. मागील 9 वर्षाच्या काळात नरेंद्र मोदी यांनी भारत देशाची मान जगभरामध्ये उंचावली असून त्यांच्या कार्याची माहिती व्हावी वी म्हणून औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार औसा शहरातील नागरिकांच्या दारी जाऊन संवाद साधत आहेत. बुधवार दिनांक 21 जून रोजी यांनी अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृह येथे नागरिकाशी संवाद साधला. नागरिकांनी आपल्या शेत रस्त्याच्या अडचणी बद्दल चर्चा केली. शेत रस्ते शिवरस्ते आणि पानंद रस्त्यासाठी आमदार निधीतून भरीव निधी आहे, परंतु रस्त्याच्या मजबुतीकरण कामासाठी प्रस्ताव करून शासन स्तरावर आपण सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी संवाद साधत असताना दिली रमाई आवास योजना शबरी आवास योजना, वाल्मिकी आवास योजना, वसंतराव नाईक आवास योजना, तसेच प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या योजनेच्या माध्यमातून बेघरांना घरी देण्याचा प्रयत्न सुरू असून उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना मोफत गॅस कनेक्शन घेऊन महिलांच्या अडचणी दूर केल्या आहेत. शासकीय योजनेचा लाभ जनधन बँक खात्यात थेट जमा होत असल्याने यंत्रणेतला भ्रष्टाचार कमी होण्यास मदत झाली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. धनगर गल्ली औसा येथे आयोजित कार्यक्रमास साठी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा . भिमाशंकर राजट्टे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील उटगे, शहराध्यक्ष लहू कांबळे, ज्येष्ठ नेते सुशील कुमार बाजपाई, भीमाशंकर मिटकरी, गोपाळ धानोरे, शिवरुद्र मुरगे, बाजार समितीचे संचालक शंकर पुंड, विनोद मंजिले, कुणाल दीक्षित, मनोज कुरसुळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी येथील शेकडो नागरिक व युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.