साबरमती द ग्लोबल स्कूल झाले बाल वारकरी मुळे भक्तिमय
औसा-तालुक्यातील बुधोडा येथील साबरमती द ग्लोबल स्कूल येथे पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त शालेय बाल मुला मुलींनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करून टाळ मृदंगाच्या गजरामध्ये साक्षात पंढरपूर सारखे भक्तिमय वातावरणात सुंदर आणि देखणा कार्यक्रम संपन्न झाला.
साबरमतीच्या प्रांगणात टाळ मृदंग ,हार्मोनियम,च्या संगीतमय वातावरणात श्री दीपक शिंदे यांनी "मन लागो रे लागो ,माझे गुरु चरणी "हे गीत गायले. शालेय मुला मुलींनी व शिक्षक कर्मचाऱ्यांनी देखील वारकऱ्यांच्या वेशभूषा मध्ये भव्य पताका दिंडी टाळ मृदंग घेऊन हरिनामाचा गजर करीत भक्तीमय वातावरणामध्ये तल्लीन होऊन हा सोहळा यशस्वी पार पडला. विद्यालयाचे व्यवस्थापक संचालक यश बलदवा, प्राचार्य सीमा सरोज मॅडम, कोरिओग्राफर संतोष भस्मे, प्रशांत जोगदंड ,सुमित जोगदंड, आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.