गुरूपौर्णिमा संगीत महोत्सव औसा येथील मुक्तेश्वर मंदिरात संपन्न

गुरूपौर्णिमा संगीत महोत्सव औसा येथील मुक्तेश्वर मंदिरात संपन्न



.औसा : ( प्रतिनिधी ) औसा येथील माऊली प्रतिष्ठान व माऊली संगीत विद्यालयाच्या वतीने रविवारी मुक्तेश्वर मंदिरात गुरूपौर्णिमा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  पं. शिवरुद्र स्वामी गुरुजी यांच्या माऊली संगीत विद्यालयातील सर्व शिष्यानी गुरुजींच्या पाद्यपूजनानंतर  गायन वादन सादरीकरण करून गुरूपौर्णिमा साजरी केली.       यावेळी सुनील चेलकर, ॲड. भालचंद्र पाटील, राजाभाऊ जंगले, विश्वनाथ धुमाळ, नरसिंग राजे, गजेंद्र जाधव, चैतन्य पांचाळ, व्यंकटराव राऊतराव, हणमंत लोकरे, खंडू क्षीरसागर, अथर्व घाडगे, सिद्धी अजने, श्रुष्ठी नारंगवाडे, आशा सोमवंशी यांचे गायन तर कैवल्य पांचाळ, महेश डोके, चैतन्य मुसांडे, विश्वजित डोके, ओमकार चव्हाण यांनी वादनाची साथसंगत केली.        पं. शिवरुद्र स्वामी यांनी राग शुद्ध कल्याण, ठुमरी व भैरवी गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.यावेळी मुक्तेश्वर देवालय न्यास चे अध्यक्ष ॲड. मुक्तेश्वर वागदरे, लोकाधिकारप्रमुख तथा लोकाधिकार न्यूजचे संपादक व्यंकटराव पनाळे, मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, कापड व्यापारी अर्जुन ढगे हे मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक हलकुडे सर यांनी केले. तर कार्यक्रमास औसा परिसरातील रसिक श्रोते उपस्थित होते, असे प्रसिद्धी प्रमुख शिवाजी भातमोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या