औसा पोलीस निरीक्षक पदी सुनील रेजितवाड यांनी स्वीकारला पदभार

औसा पोलीस निरीक्षक पदी सुनील रेजितवाड यांनी स्वीकारला पदभार



औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांची बदली झाल्यामुळे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून सुनील रेजितवाड यांनी गुरुवार दिनांक सात जुलै रोजी पदभार स्वीकारला सुनील रेजीतवाड यांनी परभणी, नांदेड, शिरूर आनंदपाल, औराद शहाजानी, येथील पोलीस ठाण्यासह लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावले आहे. आता औसा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदाचा त्यांनी पदभार स्वीकारला असून औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अवैध धंद्याला पाठीशी घातले जाणार नाही तसेच औसा शहरांमध्ये सर्व धर्मीयांचे सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण प्रयत्नशील असून नागरिकांच्या सहकार्याने औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आपण शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनातील अधिकारी म्हणून जनतेशी समन्वयाने काम करीत राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली. सुनील रेजितवाड यांच्या रूपाने औसा पोलीस स्टेशन साठी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक लाभले असून शिवशंकर पटवारी यांच्या निरोप समारंभा निमित्त व सुनील रेजितवाड यांच्या पदभार स्वीकृती कार्यक्रमाबद्दल नागरिकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या