औसा मतदारसंघातील विकासकामांसाठी ६४ कोटींचा निधी मंजूर..... १३ रस्ते सुधारणा कामांसाठी ५२ कोटी तसेच मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय बांधकामासाठी १२.३० कोटींचा निधी....

औसा मतदारसंघातील विकासकामांसाठी ६४ कोटींचा निधी मंजूर..... 




१३ रस्ते सुधारणा कामांसाठी ५२ कोटी तसेच मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय बांधकामासाठी १२.३० कोटींचा निधी.... 





औसा - आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे औसा विधानसभा मतदारसंघातील १३ रस्ते सुधारणा, रुंदीकरण, पूल बांधकाम व दुरुस्ती कामांसाठी ५२ कोटी रुपये तर मतदारसंघातील १२ मंडळ अधिकारी आणि ७० तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी १२.३० कोटी रुपये असा एकूण ६४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून औसा मतदारसंघातील विकास कामांना आणखी गती मिळणार आहे.

          पावसाळी अधिवेशन २०२३ पुरवणी मागण्यांद्वारे व नाबार्डच्या माध्यमातून औसा तांडा ते औसा शहर रस्त्याच्या पूल-मोऱ्या बांधकामासह सुधारणा कामासाठी ६.५० कोटी रु., औसा शहरातील जुने बसस्थानक ते औसा मोड रस्त्याच्या दुतर्फ़ा आरसीसी नाली बांधकाम, फूटपाथ बांधकाम व रोड फर्निचर काम करण्यासाठी ९.५० कोटी रु., राममा ३६१ - औसा - याकतपूर - कन्हेरी - जयनगर - येळी - शेडोळ - खरोसा - रामा २४४ या रस्त्यालगत कन्हेरी व जयनगर गावांमध्ये सीसी नाली व मोरी पुलाचे बांधकाम करण्यासाठी ३.५ कोटी रु., रामा २३८ - हसलगन - संक्राळ - जवळगा (पो.) - चिंचोली तपसे - लामजना - राममा ५४८ या रस्त्यावरील हसलगन ते संक्राळ भागाच्या रुंदीकरणासह सुधारणा कामासाठी ४ कोटी रु., आलमला - औसा - नागरसोगा - गुबाळ रस्त्यावर लिंबाळा दाऊ येथे पुलाचे बांधकाम करण्यासाठी १.४७ कोटी रु., लातूर - जमालपूर - हासेगाववाडी - लामजनापाटी - प्रजिमा ५१ या रस्त्यावर आपचुंदा गावाजवळ पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी रु., औसा - याकतपूर - कन्हेरी - जयनगर - येळी - शेडोळ - खरोसा - रामा २४४ रस्त्यावर जयनगर गावाजवळ पुलाचे बांधकाम करण्यासाठी १.३७ कोटी रु., निलंगा - कासार सिरसी रस्त्यावर हासोरी गावामध्ये काँक्रीट नाली बांधकाम करण्यासाठी ४ कोटी रु., निलंगा - कासार सिरसी रस्त्यावर कासार सिरसी गावाजवळील तळ्याच्या बाजूच्या पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी ५ कोटी रु., औराद - ताडमुगळी - रामा २३७ - ममदापूर - राज्य सीमा रस्त्यावर ममदापूरजवळील रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी १.२५ कोटी रु., चिंचोली भंगार - चिंचोली सायखान - उस्तुरी - बडूर - औंढा - रामा २३७ या रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी ११.२५ कोटी रु., रामा २४४ - धानोरा - मदनसुरी - हाडोळी - रामलिंग मुदगड - रामा २३७ या रस्त्यावर मदनसुरी गावाजवळ पुलाचे बांधकाम करण्यासाठी १.४८ कोटी रु. तसेच नाईचाकूर - कासार सिरसी - तांबाळा - राज्य सीमा या रस्त्यावर तांबाळा गावाजवळ पुलाचे बांधकाम करण्यासाठी १.६७ कोटी रु. असा एकूण ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

        याचबरोबर औसा तालुक्यातील ८ मंडळ अधिकारी आणि ४७ तलाठी कार्यालयांच्या तसेच कासार सिरसी मंडळातील ४ मंडळ अधिकारी आणि २३ तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी १२ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. औसा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत. 

..................................................

यापुढेही विकास कामांना निधीचा ओघ सुरूच राहणार - आ. अभिमन्यू पवार 


औसा मतदारसंघातील रस्ते सुधारणा कामांना आणखी वेग येईल या कामाव्दारे वाहतूक दळणवळणाला चालना मिळेल तसेच अद्ययावत मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांना आणि विशेषतः शेतकरी बांधवांना अधिक चांगल्या पद्धतीने सुविधा पुरविता येणार आहे. औसा मतदारसंघातील अनेक प्रस्तावित कामे मंजुरीच्या अंतिम टप्यात असून त्यांसाठीही  पाठपुरावा सुरु असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या