पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात प्रशि. पोलीस उपाधीक्षक अंकिता कणसे यांच्या नेतृत्वात AHTU पथकाची कारवाई, देहविक्रयचा व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेला अटक. 2 पीडित महिलांची सुटका*
लातूर
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 19/07/2023 रोजी AHTU पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, लातूर शहर परिसरातील एक महिला स्वतःच्या घरात आर्थिक फायद्यासाठी बाहेरून स्त्रियांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून देहविक्रीय व्यवसाय करून घेत आहे.
सदर माहितीची खातरजमा केल्यानंतर सदरची बाब खरी असल्याचे निदर्शनास येताच पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक श्री.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात व नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उप-अधिक्षक अंकिता कणसे, मपोउपनि. श्यामल देशमुख, एएचटीयु, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर यांचेसह पथकातील अधिकारी व महिला अमलदार यांचे पथकाने बनावट ग्राहक पाठवून सदर ठिकाणी छापा मारण्यात आला.
त्या ठिकाणी देहविक्रीय करीत असताना 2 पिडीत महिला व वेश्या व्यवसाय करून घेणारी एक महिला आढळून आले. त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 12,175/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच पिडीत महिले कडून देहविक्रय व्यवसाय करून घेणारी महीला स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर गावाच्या महिलांना स्वतःचे घरात ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेते व आम्हाला काही रक्कम देऊन आमची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करते असे पीडित महिलांनी सांगितले.
सदर प्रकारा बाबत पोलीस पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 537/2023. कलम 370 ,34 भा.द. वि. तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956, कलम-3,4,5, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेस अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही वरिष्ठांचे मार्गदर्शनात प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधिक्षक, श्रीमती. अंकिता कणसे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे, महिला पोलिस उप निरीक्षक, श्यामल देशमुख, ओपन सुभाष सूर्यवंशी, पोलीस अमलदार जाधव, योगी, मपोना सुधामती वंगे, लता गिरी यांनी केली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. गोरख दिवे हे करीत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.