लातूर जिल्ह्यात सुमारे 89 टक्के पेरणी पूर्ण !

लातूर जिल्ह्यात सुमारे 89 टक्के पेरणी पूर्ण !



 लातूर, दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीला वेग आला असून 18 जुलै 2023 पर्यंत 5 लाख 32 हजार 287 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीनची सरासरीच्या 105 टक्के, तुरीची 59 टक्के, मुग पिकाची 30 टक्के, उडीद पिकाची 24 टक्के, मका 37 टक्के, बाजरी 61 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 4 लाख 28 हजार 121 हेक्टर असून 4 लाख 49 हजार 847 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी पूर्ण झाली आहे. मुगाचे सरासरी क्षेत्र 11 हजार 459 हेक्टर असून 3 हजार 514 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. तुरीचे सरासरी क्षेत्र 1 लाख 1 हजार 815 हेक्टर असून 60 हजार 524 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. ज्वारीचे सरासरी क्षेत्र 29 हजार 30 हेक्टर असून आतापर्यंत 5 हजार 351 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र 7 हजार 512 हेक्टर असून आतापर्यंत 7 हजार 178 हेक्टरवर पेरणी झाली आहे.

मका पिकाचे सरासरी क्षेत्र 5 हजार 600 हेक्टर असून 2 हजार 76 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. भात पिकाचे सरासरी क्षेत्र 1 हजार 272 हेक्टर असून 61 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. बाजरी पिकाचे सरासरी क्षेत्र 837 हेक्टर असून 515 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र 9 हजार 263 हेक्टर असून 2 हजार 231 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. भुईमुगाचे सरासरी क्षेत्र 1 हजार 233 हेक्टर असून आतापर्यंत 166 हेक्टरवर पेरणी झाली आहे.

तीळ पिकाचे सरासरी क्षेत्र 940 हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी 189 हेक्टरवर झाली आहे. कारळे पिकाचे सरासरी क्षेत्र 474 हेक्टर असून 86 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. सुर्यफुल पिकचे सरासरी क्षेत्र 329 हेक्टर असून 5 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे.

खताची मागणी व पुरवठ्याचे नियोजन

लातूर जिल्ह्यात मागील 3 वर्षांचा खताचा सरासरी वापर 96 हजार 581 मे. टन एवढा असून यावर्षी जिल्ह्याने 1 लाख 61 हजार 800 मे. टन मागणी नोंदविली होती. त्यानुसार कृषि आयुक्तालयाकडून जिल्ह्याला 1 लाख 12 हजार 260 मे. टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे. मार्चअखेर जिल्ह्यात 64 हजार 018 मे. टन खताचा साठा होता, एप्रिल ते दिनांक 14 जुलै 2023 अखेर जिल्ह्यात 70 हजार 808 मे. टन एवढा पुरवठा झाला आहे. एप्रिल ते 14 जुलै 2023 अखेर 52 हजार 478 मे. टन खताची विक्री झाली असून 82 हजार 348 मे. खताचा साठा शिल्लक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या