जनसेवेचे वृत्त घेऊन आरोग्य शिबिराच्या माध्यमातून शिवसेना कार्यरत बजरंग दादा जाधव यांचे प्रतिपादन

औसा प्रतिनिधी 
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे धोरण घेऊन जनसेवेचे वृत्त घेऊन शिवसेना सर्वसामान्य तळागाळातील माणसाच्या सेवेसाठी कार्यरत आहे. शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आणि माजी मंत्री तथा युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेने औसा तालुक्यातील प्रत्येक गावासह वाडी तांड्यावर जाऊन सर्व रोग निदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचा संकल्प केला असून आरोग्य सेवेच्या माध्यमातून शिवसेना गरजू लोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख बजरंग दादा जाधव यांनी केले. औसा येथील भोई गल्ली हनुमान मंदिर येथे आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा उपप्रमुख बजरंग दादा जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या संघटिका जयश्रीताई उटगे ,माजी तालुकाप्रमुख संजय उजळंबे, विद्यमान तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, शिबिराचे संयोजक किरण कदम, बाळू नरवाडे, सचिन पवार, गणेश गायकवाड, सुमित कोदरे, जीवन थोरात, सुमित क्षीरसागर यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. रविवार दिनांक 16 जुलै रोजी भोई गल्ली औसा येथील आयोजित शिबिरामध्ये शेकडो रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आला तर नेत्र रुग्णांची तपासणी करून गरजू रुग्णांना अत्यल्प दरामध्ये नंबर काढून चष्मे देण्यात आले. ग्रामीण भागातून शिवसेनेच्या आरोग्य शिबिरात अनेक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. तर औसा येथे शहरातील पहिल्या शिबिरामध्ये शेकडो रुग्णांनी शिबिरामध्ये सहभाग घेऊन आयोजकांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या