पीक विम्याचे सर्व्हर पडले बंद
» शेवटचे चार दिवस उरल्याने शेतकरी अडचणीत, मुदतवाढ देण्याची मागणी »
औसा प्रतिनिधी
पांचाळ विठ्ठल
नांदेड नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना संरक्षण मिळावे म्हणून पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत एक भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून सर्व्हर चालत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ २४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.त्या अनुषंगाने राज्य शासन शेतकऱ्यांच्या हिस्याचा विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त 1 रूपया देऊन पिक विमा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी विमा भरण्यासाठी धावपळ करत असून आता फक्त 3-4 दिवस शिल्लक राहिले असून आँनलाईन सर्व्हर चालत नसल्याने शेतकऱ्यांची दमछाक होत असून संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना पाऊस घरांच्या बाहेर निघू देत नाही त्यामध्ये सी.ए.सी चालकांकडे गेले की सर्व्हर चालत नाही असे सांगण्यात येत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.