*स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा, 13 इसमाविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल 06 लाख 94 हजार 460 रुपयाचा मुद्देमाल जप्त*
लातूर
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.
अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 25/07/2023 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदपूर पोलीस ठाणे हद्दीतील जगळपूर जाणारे रोडवर भगतसिंग पवार याचे शेतातील पत्र्याच्या शेडवर छापा मारला असता तेथे इसम नामे-
1) फारूक अहमद नळगीरे ,45 वर्ष, राहणार हाडोळती.
2) भगतसिंग शिवराम पवार, वय 59 वर्ष, हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर.
3) इरफान मुबारक शेख, वय 24 वर्ष, हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर
4) सचिन संपत्ती कांबळे, वय 32 वर्ष,हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर
5) अनिल पुंडलिक साखरे, वय 44 वर्ष,हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर
6) इनामदार अब्दुल कासिम, वय 48 वर्ष,हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर
7) अंतेश्वर ज्ञानोबा पवार, वय 27 वर्ष,हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर
8) सूर्यकांत माधव गायकवाड, वय 41 वर्ष,हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर
9) अर्जुन अशोक जाधव, वय 27 वर्ष,हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर
10) बालाजी नारायण वसमतकर, वय 54 वर्ष,हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर
11) काशिनाथ तुकाराम पोटसुळवार, वय 57 वर्ष, हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर
12) दस्तगीर रशीद शेख वय 55 वर्ष, राहणार शिवनखेड तालुका अहमदपूर.
13) मारुती गुट्टे, राहणार सेलदरा तालुका जळकोट (फरार)
असे नमूद ठिकाणी ग्रुप करून स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहने असा एकूण 06 लाख 94 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून नमूद आरोपी विरोधात पोलीस ठाणे अहमदपूर येथे कलम 12(अ) मुंबई जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद मुद्देमाल व 12 इसमांना पुढील तपास कामी अहमदपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस अंमलदार संपत फड, मोहन सुरवसे व पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अमलदार आरदवाड, पोलीस नायक आरदवाड, पोलीस कॉन्स्टेबल पुठ्ठेवाड आणि कज्जेवाड यानी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.