औसा प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविता यावी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाला चांगली दिवस यावे म्हणून प्रधानमंत्री किसान समृद्धी योजना कार्यान्वित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच छताखाली शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारचे खते बियाणे कीटकनाशके जैविक औषधे सेंद्रिय खते शेतीसाठी लागणारे कृषी अवजारे तसेच शेतीसाठी कर्ज मिळवून घेण्याच्या प्रक्रिया यासह केंद्रावर एटीएम किंवा आर कोड स्कॅनर इत्यादी माध्यमातून सर्व अद्यावत सुविधा देण्यात येणार आहेत या केंद्रावर शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करणे पिक विमा कसा भरावा तसेच शेतीसाठी येणाऱ्या अडचणी या बाबत अत्याधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर व तज्ञ व्यक्तीच्या साह्याने प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे औसा शहर व परिसरासाठी गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे भव्य उद्घाटन होणार असून या कार्यक्रमा साठी औसा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन साईबाबा कृषी सेवा केंद्राचे संचालक संजय पवार यांनी केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.