औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्यावी तहसीलदार भरत सूर्यवंशी

औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्यावी तहसीलदार भरत सूर्यवंशी


 औसा प्रतिनिधी औसा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये स्मार्टफोन घेऊन ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून प्ले स्टोअर मध्ये आपले प्रथम गाव निवडावे नंतर आपला गट क्रमांक निवडून आपल्या शेतातील शेतीमध्ये पेरणी आणि लागवड केलेल्या पिकाची नोंद करावी तसेच आपल्या शेतीमध्ये फळझाडांची लागवड केलेली असल्यास आणि विहीर किंवा बोरवेल घेतलेले असल्यास त्याचीही पाहणे द्वारे नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे माझा शेतकरी माझा सातबारा मीच नोंदविणार पीक पेरा या शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांनी पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक असून भविष्यात आपल्याला शासनाच्या हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्री करण्यासाठी तसेच पिक विमा भरणे पीक कर्ज घेणे किंवा बँकेतून शेती साठी कर्ज घेणे या सर्व बाबीसाठी पाहणी आवश्यक असून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून त्या गटात जाऊन फोटो घेणे आवश्यक आहे दुसरीकडील फोटो असल्यास ई पीक पाहण्याची नोंद होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे असे आवाहन तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या