*नशाकारक गोळ्यांची अवैधरित्या विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची छापेमारी. नशाकारक व इतर गोळ्यासह 1 लाख 358 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. मेडिकल चालकासह तिघांवर गुन्हा दाखल
लातूर( प्रतिनिधी )
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करणे बाबत निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथके अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 27/08/2023 रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, काही इसम अवैधरित्या, विनापरवाना डॉक्टरांनी लिहून दिलेले प्रिस्क्रिप्शन नसताना नशा करण्यासाठी झोपेच्या गोळ्यांची, गर्भपातकरिता वापरण्यात येणारे गोळ्या तसेच पुरुषांमध्ये कामवासणा वाढविण्यासाठी गैरवापर होण्याची शक्यता असलेल्या गोळ्यांची अवैधपणे विक्री करण्यासाठी स्वतःच्या ताब्यात बाळगून आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यासह लातूर शहरात विविध ठिकाणी छापा मारून पंचा समक्ष झडती घेऊन नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या झोपेच्या गोळ्यांची, गर्भपातकरिता तसेच पुरुषांमध्ये कामवासणा वाढविण्यासाठी गैरवापर होण्याची शक्यता असलेल्या गोळ्या आढळून आल्या ते जप्त करून अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगी/परवान्याशिवाय व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकता किंवा खरेदी करता येत नाहीत असे असतानाही सदरच्या गोळ्यांची विक्री करणारे इसमांना नमूद वर्णनाच्या गोळ्यासह ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे नाव-
1) महेश धोंडीराम घुगे, वय 37 वर्ष, राहणार हेर (कुमठा) तालुका उदगीर. सध्या राहणार महाडा कॉलनी, हरंगुळ तालुका लातूर.
2) बालाजी सुरेश मदने, वय 38 वर्ष, राहणार बोरी, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. सध्या राहणार मजगे नगर, लातूर.
3) रुपिन जयंतीलाल शहा, वय 63 वर्ष, राहणार मंठाळे नगर, लातूर.
असे असून यातील इसम क्रमांक 1 महेश घुगे याची पाखरसांगवी शिवारात कुबेर नावाचे मेडिकल स्टोअर्स असून इसम क्रमांक 3 रुपीन जयंतीलाल शहा याची 'अश्विनी इंटरप्राईजेस' नावाने गांधीमार्केट, लातूर येथे होलसेल मेडिकल दुकान आहे. तर इसम क्रमांक 3 बालाजी सुरेश मदने हा 'अश्विनी इंटरप्राईजेस' मधून सदरच्या गोळ्या खरेदी करून इतरांना पुरवठा करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वरील तीन इसमा विरुद्ध पोलीस ठाणे, शिवाजीनगर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक श्रीमती अंजली मंगलप्पा मिटकर यांचे फिर्याद वरून गुरक्र. 444/2023 कलम 276,328, 34 भादवी. सह कलम 8(क), 22(अ) गुंगीकारक आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 तसेच कलम 18(अ),18( क) औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमूद गुन्ह्यात वरील आरोपींना पुढील कार्यवाहीस्तव शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून अवैध विक्रीसाठी आणलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगी परवान्याशिवाय व डॉक्टरांचे शैल्याशिवाय विकता किंवा खरेदी करता येत नसणारे नशा करण्यासाठी गैरवापर करण्यात येणाऱ्या झोपेच्या गोळ्या, गर्भपातकरिता वापरण्यात येणारे गोळ्या तसेच पुरुषांमध्ये कामवासणा वाढविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या व मोबाईल असा एकूण 1 लाख 358 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगर करीत आहेत. गुन्ह्यातील अटक आरोपीना आज रोजी मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
*तरुणांकडून नशा करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात असून त्यात नशेसाठी झोपेच्या गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात अवैध वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेकडून गोपनीय माहिती काढून सदरची कार्यवाही करण्यात आली आहे .सदर कारवाईमुळे अवैध औषध विक्रेते, मेडिकल चालक व संबंधित लोकांचे धाबे दणाणले असून अवैध औषधी विक्री करणारे विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.*
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वातील विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अमलदार माधव बिलापट्टे,नवनाथ हासबे, संपत फड, नाना भोंग, राजेश कंचे, राजेभाऊ मस्के, तुराब पठाण तसेच अन्न व औषध विभागचे औषध निरीक्षक अंजली मिटकर यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.