पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांची पोलीस ठाणे रेणापूर हद्दीत अवैध जुगारावर छापेमारी, 14 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 2 लाख 9 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त


पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांची पोलीस ठाणे रेणापूर हद्दीत अवैध जुगारावर छापेमारी, 14 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 2 लाख 9 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.



  लातूर (प्रतिनिधी )            या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस उपविभाग चाकूर अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी  चाकूर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांनी उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन केले असून त्यांचे मार्फत चाकूर उपविभागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
             दरम्यान दिनांक 26/08/2023 रोजी काही इसम पैशावर तिर्रट जुगार खेळत आहेत अशी संबंधित पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पथकाने रेणापूर खरोळा शिवारात एका शेतातील लिंबाच्या झाडाखाली  छापेमारी करून बेकायेशीररित्या जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने एकूण 14 इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लाख 9 हजार 420 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
          पोलीस ठाणे रेणापूर मध्ये खालील नमूद इसमाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चा कलम 12( अ ) कायद्यान्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1) भागवत प्रल्हाद आडतराव,वय 38 वर्ष  
2) प्रकाश रामराव देशमुख, वय 55 वर्ष
3)हानमंत साहेबराव राऊतराव  वय 53 वर्ष 
4). सचीन लक्ष्मण आडतराव,वय 49 वर्ष 
5) अनंत गोपीनाथ घोडके, वय 45 वर्ष्  6) राघुनाथ रामचंद्र घोडके, वय 57 वर्ष 
7)रमेश धनु जाधव, वय 40 वर्ष 
8)महेश दिलीप भोपी, वय 35 वर्ष 9)नागनाथ दगडु उपाडे, वय 35 वर्ष
10) सलीम मेहमुद सय्य्द, वय 33 वर्ष
 11)गणेश बळीराम राठोड, वय 27 वर्ष  
 12)संजय पांडुरंग शिंदे, वय  52 वर्ष
 13)वसंत रामा लोहार, वय 63 वर्ष
 14)उत्तम जगन्नाथ पवार, वय 53 वर्ष सर्व रा.खरोळा ता.रेणापुर 
                    
                    असे असून पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 26/08/2023 रोजी पोलीस ठाणे रेणापूर येथील  कारवाईत पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांचे नेतृत्वातील PSI जाधव, HC कलमे आणि इतर अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे. पुढील तपास रेणापूर पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या