*रस्त्यावरील पुलाचे बांधकामाचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्या 5 आरोपींना 4 लाख 40 हजार रुपयाच्या मुद्देमालसह अटक. लोखंडी साहित्य चोरीचे 3 गुन्हे उघड. शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याची कारवाई.*
लातूर प्रतिनिधी
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पोलीस रात्रगस्त व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करण्याची मोहीम संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच कोंबिंग ऑपरेशन राबवून चोरी, घरफोडी करणाऱ्या आरोपींना, फरार आरोपींना ताब्यात घेतले जात आहे.
दरम्यान दिनांक 19/08/ 2023 ते 20/08/2023 च्या मध्यरात्री पोलीस ठाणे शिरूर आनंतपाळ चे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत घुले त्यांच्या टीम सह रात्रगस्त सुरू असताना त्यांना माहिती मिळाली की, डिगोळ ते कराडखेल जाणारे रोडवरील पुलाचे बांधकामासाठी ठेवलेले लोखंडी प्लेट काही अनोळखी व्यक्ती पीकअप मध्ये भरून चोरून घेऊन जात आहेत सदरचा पिकअप वाहन नळेगावच्या दिशेने गेलेले आहे. अशी माहिती मिळाली. सदर माहितीची खातरजमा करून सदरची माहिती वायरलेस द्वारे तात्काळ वरिष्ठांना कळविली. त्यावरून पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी,चाकूर सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी चाकूर उपविभागातील गस्तीवरील पोलीस पेट्रोलिंगला अलर्ट करून पोलीस ठाणे चाकूर, रेणापूर यांना आपापल्या पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पेट्रोलिंगला सदरची माहिती देऊन पेट्रोलिंग वरील पोलीस अधिकारी/अंमलदार त्यांचे पथके तयार पळून जाणाऱ्या पिकअप वाहनाचा पाठलाग करण्यात येत होते. सदर पथकामार्फत उदगीर मोड जवळ नाकाबंदी लावून अतिशय सीताफिने नमूद आरोपींना पिकअप वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
रस्त्यावरील पुलाचे बांधकामाचे लोखंडी प्लेट चोरून घेऊन जात असलेले इसम नामे
1) समाधान धनाजी कांबळे, वय 20 वर्ष
2) साईनाथ मनोहर गायकवाड, वय 21 वर्ष.
3)मोहन महादेव सूर्यवंशी, वय 19 वर्षे,
4) सुरेश धोंडीबा साळुंखे, वय 19 वर्ष,
5) विलास भागवत चामलवाड, वय 22 वर्ष, सर्व राहणार शिवनखेड, तालुका चाकूर जिल्हा लातूर.
असे मिळून आले.नमूद आरोपींना ताब्यात घेऊध त्यांनी चोरलेला मुद्देमाल लोखंडी प्लेट व त्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेला पिकअप वाहन मोटरसायकल असा एकूण 4 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपीताकडे विचारपूस करून मिळालेल्या माहितीप्रमाणे नमूद आरोपींनी शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाचे लोखंडी साहित्य चोरल्याचे आणखीन दोन गुन्हे केल्याचे सांगत असून त्या दिशेने हे तपास सुरू आहे.
नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ येथे गुन्हा नोंद क्रमांक 145/2023 कलम 379, 34 भादवि प्रमाणे दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत घुले करीत आहेत .
एकंदरीत चाकूर उपविभागातील ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलिसांनी समय सूचकता दाखवत अतिशय शिताफीने व आपसात ताळमेळ साधत गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी, चाकूर सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे ,पोलीस उपनिरीक्षक हनुमंत घुले, चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक फड, पोलीस अमलदार शिवकुमार बिराजदार, अंबादास पाटील, श्रीराम सांडुर, सूर्यप्रकाश गिरी, किशोर खांडेकर यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.