मोबाईल हिसकावणाऱ्या जबरीचोरी मधील 2 आरोपींना मुद्देमालासह अटक. पोलीस ठाणे गांधी चौक ची कामगिरी. मोबाईल व ऑटो सह 1,64,400/-रुपयांचा मुद्देमाल.*



 *मोबाईल हिसकावणाऱ्या जबरीचोरी मधील 2 आरोपींना मुद्देमालासह अटक. पोलीस ठाणे गांधी चौक ची कामगिरी.  मोबाईल व ऑटो सह 1,64,400/-रुपयांचा मुद्देमाल.



लातूर प्रतिनिधी 

                 या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 20/08/2023 रोजी पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीत दोन अनोळखी आरोपी ऑटो मधून येऊन एका  इसमाला अडवून जबरीने त्याच्याकडील मोबाईल व पैसे  हिसकावून घेऊन ऑटो मधून पळून जाण्याची घटना घडली होती. ज्या इसमाचा मोबाईल जबरीने चोरण्यात आला होता त्या इसमाने नमूद आरोपींचा पाठलाग करीत असतानाच गांधीचौक पोलिसांशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. त्यावरून गांधीचौक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून त्यांना सुभाष चौक परिसरामध्ये ऑटोसह ताब्यात घेतले.
              ताब्यात घेतलेल्या आरोपी कडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव

1) प्रेम विनोद उर्फ विलास जाधव , राहणार सिद्धार्थ सोसायटी लातूर.

2)सिद्धेश्वर बालाजी जाधव, राहणार संत गोरोबा सोसायटी, लातूर.
                असे असल्याचे सांगून त्यांनीच गांधी मार्केट परिसरात फिर्यादीला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व चौदाशे रुपये जबरीने चोरल्याचे कबूल केले.
              फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून  पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा क्रमांक 415/ 2023 कलम 392, 34 भादवि ( दुखापत करून लुटणे,लुटण्याचा प्रयत्न करणे) या कलमाखाली  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास गांधीचौक पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अक्रम मोमीन करत आहेत. 

                जबरी चोरीच्या घटनेची माहिती मिळताच अतिशय जलद गतीने तात्काळ कार्यवाही करत, पोलिसांनी जबरी चोरीची घटना घडल्यानंतर काही वेळातच नमूद आरोपींना ताब्यात घेऊन चोरलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण 1,65,400/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
                 सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आक्रम मोमीन, अंमलदार राजेंद्र टेकाळे, राम गवारे, दामोदर मुळे ,दत्तात्रय शिंदे, रणवीर देशमुख यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या