जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप
पोलिसांनी खिलाडू वृत्तीने कर्तव्य निभवावे : लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे.
लातूर प्रतिनिधी
पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगी खिलाडूवृत्ती जोपासली जावी तसेच त्यांच्यातील कलागुणांचा विकास व्हावा. व पोलिसांना कर्तव्य करत असताना निर्माण होणाऱ्या सततच्या तणावातून काहीसा विसावा मिळावा या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा शनिवारी (दि. 19) रोजी बाभळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेसाठी पोलीस मुख्यालय, चाकूर उपविभाग, अहमदपूर उपविभाग, निलंगा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनचे पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदर क्रीडास्पर्धावर विशेष लक्ष देऊन प्रत्येक पोलीस उपविभागातील जास्तीत जास्त स्पर्धक सदर क्रीडास्पर्धेसाठी उपस्थित राहतील याची दक्षता घेतली होती. यामुळेच प्रथमतःच सदरच्या क्रीडा स्पर्धेमध्ये लातूर जिल्ह्यातील जवळपास 135 पोलीस अमलदार व 25 पोलीस अधिकारी यांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलागुणांच्या प्रदर्शन केले.स्वतः पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक ,सहायक पोलीस अधीक्षक तसेच सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी, पोलीस निरीक्षकांनी पोलीस अमलदारांसोबत विविध क्रीडा प्रकारात सक्रिय सहभाग नोंदवला होता. स्वतः पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक खेळामध्ये सहभागी झाल्याने पोलीस अमलदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळत होता.
दिनांक 19 ऑगस्ट रोजी संपलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे हे होते. तर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, पोलीस उपअधीक्षक (गृह) अंगद सुडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शनपर भाषणात महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी "ताणतणावमुक्त जीवनशैलीसाठी खेळांची आवड जोपासली पाहिजे, प्रत्येक पोलीस अमलदार हे समाजाचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे कर्तव्य पार पडताना खिलाडू वृतीने आव्हान स्वीकारून काम करावे. आज खाजगी /कार्पोरेट क्षेत्राततील व्यक्ती पेक्षा युनिफॉर्म सर्विस मध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची समाजाप्रती मोठी जबाबदारी असल्याने पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी लोकशाही,शाशनाप्रती,जनतेप्रती एकनिष्ठ राहून कर्तव्य पार पाडावे" असे सांगितले.
पोलीस मुख्यालय मैदानावर तीन दिवसात फूटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कब्बडी तसेच 100, 200, 400 व 800 मिटर धावणे, गोळाफेक, लांबउडी, भाला फेक, थाळी फेक, तायक्वांदो, पोहणे, बास्केटबॉल आदी स्पर्धा पार पडल्या. तर पोलिस अधिकारी व अमलदारांमध्ये रस्सीखेच स्पर्धा झाली यामध्ये पोलीस अंमलदार विजयी झाले तर पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी संगीत खुर्चीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि.19) उर्वरित स्पर्धा घेऊन त्यानंतर समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
संगीत खुर्चीमध्ये ऋतुजा मगडलवार यांनी प्रथम तर महिला पोलीस अमलदार रेखा कलकत्ते यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 100 मिटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये श्रीहरी डावरगावे यांनी प्रथम व विक्रम भांगे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
या क्रीडा स्पर्धेत चाकूर, अहमदपूर ,निलंगा उपविभाग व पोलीस मुख्यालय अशा एकूण चार विभागांचे संघ सहभागी होते. पोलीस मुख्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर बेस्ट ऍथलेटिक्स पुरुष मध्ये पोलीस अमलदार प्रशांत स्वामी तर बेस्ट ऍथलेटिक्स महिला यामध्ये पूनम शेटे यांनी पदक मिळवले. सर्वच विजेते उत्कृष्ठ महिला खेळाडू व पुरुष खेळाडू यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ट्रॉफी व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
सदर क्रीडा स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक अंकिता कणसे, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजीवन मिरकले, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, दिलीप डोलारे, ,पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट उपनिरीक्षक आयुब शेख, तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार, खेळाडू, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी, पोलिसांच्या कुटुंबीयांची मोठ्या उपस्थिती होती. पुरस्कार वितरण झाल्यानंतर सर्वांसाठी जेवणाची व संगीत रजनी चे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधीक्षक अंकिता कणसे यांनी अतिशय गोड आवाजात हिंदी व मराठी गीत गायले तसेच पोलिस अमलदारांनी सुद्धा गायन करत देशभक्तीपर गाण्यावर नृत्य केले. एकंदरीत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी यांनी पूर्ण क्रीडा स्पर्धेवर विशेष लक्ष देऊन पोलीस खेळाडूं सोबत सक्रिय सहभाग नोंदवल्याने अतिशय उत्साही व आनंददायी वातावरणात सदरचे क्रीडा स्पर्धा पार पडल्या आहेत.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक अंकिता कणसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले राखीव पोलीस निरीक्षक शेख गफ्फार, राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप माने, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख ,क्रीडा प्रमुख रामलिंग शिंदे ,युसुफअली धावडे ,प्रशांत स्वामी अन्वर शेख, प्रशिक्षक भारती, रोनक रउफ सय्यद यांनी परिश्रम घेतले. क्रीडा स्पर्धा पारदर्शक पार पडण्याकरिता इतर विभागातील बोंबडे , बोरगे, स्वामी ,आयरेकर यांनी पंचाची भूमिका पार पाडली.
क्रीडा स्पर्धाचे संपूर्ण छायाचित्रन पोलीस अमलदार रियाज सौदागर व सुहास जाधव यांनी केले. बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गालिब शेख यांनी केले. सदर क्रीडा स्पर्धेस खेळाडू, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.