आझाद बी. एड कॉलेज औसा तालुका विधी सेवा समिती व महिला समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अँटी रॅगिंग व कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबीर संपन्न
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील हिन्दुस्थानी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आझाद बी. एड कॉलेज तालुका औसा येथे विधी सेवा समिती व महिला समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अँटी रॅगिंग व कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा सचिव हिन्दुस्तानी एज्युकेशन सोसायटीचे मा. श्री. डॉ अफसर नवाबोद्दीन शेख. श्री सुलेमान शेख साहेब प्रदेश सचिव राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस तसेच दिवाणी न्याधीश श्री पी.आय मोकाशी साहेब उपस्थित होते, एन्टी रैगिंग बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कायद्यामधील विविध तरतुदी नियम व कलमाबाबत सविस्तर माहिती न्यायाधीश मोकाशीसाहेबांनी सांगितली तसेच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने संस्काराचे कौटुंबिक शैक्षणिक व सामाजिक महत्व अजीम ज्युनिर कॉलेजचे प्राचार्य श्री. शेख निजामोदीन साहेबांनी सखोल असे मार्गदर्शन केले
यावेळी या कार्यक्रमाला बी. एड कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती डॉ. बलित उज्वला मैडम तसेच प्रमुख- उपस्थिती म्हणून महिला केंद्राचे श्री. रामचंद्र वंजारे वैशाली राठोड पी. एम कांबले आझाद कालेज चे उपप्राचार्य श्री डॉ जहागीरदार सर वकील मंडळाचे अध्यक्ष फेरोज पठाण साहेब फार्मसी चे प्राचार्य डॉ असीम काझी सर प्राचार्य एन बि एस पालिटेक्निक चे प्राचार्य लोहारे रहेमत सर जुलेखा उर्दू डी एड चे प्राचार्य मजहर सर नाज डी एड चे प्राचार्य अय्युब सर प्रा.इमाद मुल्ला सर प्रा मस्तान सर चरकपल्ले कल्याणकर,सर प्रा.आगळे सर प्रा कांबळे सर प्रा बिदादा सर तसेच प्रा पटेल आसमा बाजी प्रा. शिरिन मॅडम डॉ नसरिन बाजी प्रा बासले बाजी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने या शिबिरास उपास्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ बलित यु एस मॅडम यांनी केले तर सुत्र संचालन प्रा. सचिन सुरवसे सर यांनी केले प्राचार्य शेख अय्युब सर यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.