सुरत चेन्नई हायवे भुसंपादन मुल्यांकनात शेतकऱ्यांची फसवणूक

सुरत चेन्नई हायवे भुसंपादन मुल्यांकनात शेतकऱ्यांची फसवणूक



विशेष वृत्तसेवा --:--
महाराष्ट्र राज्यातुन जाणाऱ्या सुरत- चेन्नई हायवेमध्ये अहमदनगर नाशिक सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतजमीनी बाधीत होत आहेत, मात्र या शेतजमीनींचा मोबदला केंद्र सरकारने अत्यल्प देवुन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
          रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगीतल्या प्रमाणे मुल्यांकन हे रेडीरेकनरनुसार होणार आहे मात्र तरीही सरकार च्या शेतकरी विरोधी उद्योगपती धार्जीणे धोरणामुळे शेतीवर संपूर्ण उदरनिर्वाह करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमीनी तुटपुंजे पैसे देऊन हिरावून घेतल्या जात आहेत.
           शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक सोलापूर जिल्ह्यातील उळे  येथील प्रातिनिधिक उदाहरणातून दिसुन येत आहे. त्याचाच विशेष आढावा घेतला असताना महत्त्वाचे घटक प्रकर्षाने समोर आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील उळे या गावातील हायवे बाधीत शेतजमीन प्रती पाच लाख पन्नास हजार रुपये मोबदला दिला आहे परंतु शासन दफ्तरी उळे गावचा रेडीरेकनर चार लाख सात हजार रुपये आहे. भुसंपादन शासन मुल्यांकन नियमानुसार      (चालू बाजार भावमुल्यानुसार नाही) १६ लाखापुढे मुल्यांकन जात आहे. त्यामुळे शासनाने सांगितल्या प्रमाणे देखील मोबदला दिला नाही.सुरत चेन्नई हायवे बाधीत शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या