ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा.
औसा(प्रतिनिधी) येथील ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यात मुलांच्या भाषण स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या कार्यक्रमाला शहर काँग्रेसचे अध्यक्ष शकील शेख,सुलतान बागवान,संस्थेचे अध्यक्ष शेख रसूलसाब गुरुजी,सरगुरु इस्माईलसाब,लातूर रिपोर्टरचे संपादक मजहर पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे सुलतान बागवान यांनी आपले विचार मांडताना सांगितले की या लहान मुलांच्या गुणवत्तापुर्वक शिक्षणासाठी सर्व शिक्षक तथा मुख्याध्यापिका अंजुम शेख खूप मेहनत घेत आहेत. या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो.यावेळी सर्व शिक्षक,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मुस्कान शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शेख अंजमुनेहा इकबाल यांनी मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.